Team India : IPL दरम्यान टी 20I मालिकेचा थरार, टीम इंडिया 5 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक

India vs South Africa Women T20i Series 2026 : वुमन टीम इंडिया आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु असताना दक्षिण आफ्रिकेत यजमान संघाविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Team India : IPL दरम्यान टी 20I मालिकेचा थरार, टीम इंडिया 5 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक
India vs South Africa Women T20i Series 2026 Schedule
Image Credit source: @ProteasWomenCSA x Account And Bcci
| Updated on: Jan 20, 2026 | 10:43 PM

मेन्स टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 21 जानेवारीपासून 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडियातील खेळाडू डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या चौथ्या मोसमात खेळत आहे. या दरम्यान क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने वुमन्स टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वुमन्स टीम इंडिया यांच्यात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमादरम्यान या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेचं आयोजन हे एप्रिल महिन्यात करण्यात आलं आहे. उभयसंघात 17 ते 27 एप्रिल दरम्यान या मालिकेचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील सामने हे डरबन, जोहान्सबर्ग आणि बेनोनीमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

वुमन्स टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 17 एप्रिल, किंग्समीड क्राट ग्राउंड, डरबन

दुसरा सामना, 19 एप्रिल, किंग्समीड क्राट ग्राउंड, डरबन

तिसरा सामना, 22 एप्रिल, वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

चौथा सामना, 25 एप्रिल, वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

पाचवा सामना, 27 एप्रिल, विलोमूर पार्क क्रिकेट स्टेडियम, बेनोनी

दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका

आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे. इंग्लंडमध्ये 12 जून ते 5 जुलै दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी 2025 च्या वुमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील 2 अंतिम संघ एकमेकांविरुद्ध 5 टी 20i सामने खेळणार आहेत. या मालिकेबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे अधिकारी एनोक न्कवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारताविरूद्धच्या या मालिकेनिमित्ताने दक्षिण आफ्रिकेला संतुलित संघ तयार करण्याची संधी मिळेल, असा विश्वास न्कवे यांनी व्यक्त केला.