SL vs WI Masters : सेमी फायनलमध्ये श्रीलंका विरुद्ध विंडीज आमनेसामने, कोण जिंकणार?
Sri Lanka Masters vs West Indies Masters 2nd Semi-Final Live Streaming : आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी 20 स्पर्धेत यंदाच्या हंगामातील अंतिम फेरीत इंडियाने धडक दिली आहे. इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत फायनलमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर आता अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता असणार? हे आज शुक्रवारी 14 मार्चला निश्चित होणार आहे. स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात श्रीलंका मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स आमनेसामने असणार आहेत. वेस्ट इंडीज मास्टर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ब्रायन लारा याच्या खांद्यावर आहे. तर कुमार संगकारा श्रीलंका मास्टर्सचं नेतृत्व करणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच केव्हा?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच शुक्रवारी 14 मार्च रोजी होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच कुठे?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच टीव्हीवर कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स या चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनल मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
कोण पोहचणार फायनलमध्ये?
𝐎𝐍𝐄 𝐓𝐈𝐂𝐊𝐄𝐓. 𝐎𝐍𝐄 𝐃𝐄𝐒𝐓𝐈𝐍𝐀𝐓𝐈𝐎𝐍. 𝐎𝐍𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐂𝐄! 💙⚔️❤️
The battleground is ready as #SriLankaMasters & #WestIndiesMasters lock horns for a place in the #IMLT20 final! 🤩#TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/W3zJgghfy3
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 14, 2025
वेस्ट इंडिज मास्टर्स टीम : ब्रायन लारा (कर्णधार), ड्वेन स्मिथ, विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, ॲशले नर्स, चॅडविक वॉल्टन, नरसिंग देवनारिन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), जेरोम टेलर, सुलेमान बेन, रवी रामपॉल, कर्क एडवर्ड्स, जोनाथन कार्टर, टीनो बेस्ट आणि फिडेल एडवर्ड्स.
श्रीलंका मास्टर्स संघ: कुमार संगकारा (कर्णधार आणि विकेटकीपर), रोमेश कालुविथराना, असाला गुणरत्ने, उपुल थरंगा, लाहिरू थिरिमाने, जीवन मेंडिस, सीक्कुगे प्रसन्ना, इसुरु उडाना, चतुरंगा डी सिल्वा, दिलरुवान परेरा,सुरंगा लकमल, चिंताका जयसिंगे, आशान प्रियरंजन, नुवान प्रदीप आणि धम्मिका प्रसाद.