IPL 2021 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीला झटका, पहिल्याच सामन्यात संकट, विश्वासू खेळाडू बाहेर!

| Updated on: Sep 15, 2021 | 8:03 AM

सीपीएल 2021 च्या उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी फाफ डु प्लेसिसला दुखापत झालीय. त्याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण होता, ज्यामुळे त्याला त्या सामन्यातूनही बाहेर पडावे लागले. आता सलग दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडल्याने त्याची दुखापत गंभीर असू शकते, अशी चर्चा सुरु झालीय.

IPL 2021 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीला झटका, पहिल्याच सामन्यात संकट, विश्वासू खेळाडू बाहेर!
एम एस धोनी आणि फाफ डु प्लेसीस
Follow us on

IPL 2021 : आयपीएल 2021 चा उर्वरित हंगामातील सामने सुरु होत आहेत. येत्या 19 सप्टेंबरपासून उर्वरित हंगामातील पहिलाच सामना पार पडत आहे. पहिलाच सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा आहे. 19 सप्टेंबरला धोनीच्या संघाला मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. पण या सामन्यापूर्वी धोनीसमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. धोनीच्या अडचणीचं मूळ वेस्ट इंडिजमध्ये चालू असलेल्या सीपीएल 2021 शी संबंधित आहेत, जिथे फाफ सेंट लुसियासाठी सेमीफायनल सारखा महत्त्वपूर्ण सामन्यात खेळताना दिसला नाही. स्पर्धेदरम्यान कंबरेच्या दुखापतीमुळे तो सामन्याबाहेर होता आणि आता आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावरही साशंकता आहे.

सीपीएल 2021 च्या उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी फाफ डु प्लेसिसला दुखापत झालीय. त्याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण होता, ज्यामुळे त्याला त्या सामन्यातूनही बाहेर पडावे लागले. आता सलग दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडल्याने त्याची दुखापत गंभीर असू शकते, अशी चर्चा सुरु झालीय.

फाफ डू प्लेसीस जर नाही खेळला तर किती मोठा झटका?

चेन्नई सुपर किंग्जसाठी फाफ डु प्लेसिसची दुखापत किती वाईट बातमी आहे, याचा अंदाज या आकडेवारीवरुन लावला जाऊ शकतो. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर डु प्लेसिस CSK साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. पहिल्या टप्प्यानंतर तो आयपीएल 2021 च्या 3 मोठ्या रन्स करणाऱ्या फलंदाजांपैकी एक होता. धवन आणि राहुल नंतर तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता.

त्याने पहिल्या टप्प्यात 7 सामने खेळले, ज्यात त्याने 320 धावा केल्या. त्याने 95 धावांची नाबाद खेळीही खेळली. वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या सीपीएलमध्ये दुखापत होण्यापूर्वी डू प्लेसिस देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने तिथेही शतक ठोकलं. याशिवाय 2 शानदार अर्धशतके देखील झळकावली.

धोनीसमोर ऑप्शन कोण?

अशा परिस्थितीत जर फाफ डु प्लेसिस मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात CSK चा भाग नसेल तर धोनीचं टेन्शन वाढू शकतं. सलामीला त्याला पर्याय शोधणं, हे देखील धोनीसमोर टेन्शन असेल. फाफ डु प्लेसिस खेळला नाही तर CSK मध्ये ऋतुराज गायकवाडसोबत सलामीचा कोण असेल? या मोठ्या प्रश्नाचे उत्तर आहे, एक तर रॉबिन उथप्पा किंवा अंबाती रायडू…!

(IPL 2021 CSk Against Mumbai Indians faf du Plessis injured tension for Ms Dhoni)

हे ही वाचा :

घटस्फोटानंतर शिखरची इन्स्टाग्रामवर भावूक स्टोरी, मुलाशी बोलताना धवनला काय वाटलं?

मोठी बातमी : टी 20 संघात स्थान न मिळताच लसिथ मलिंगाने सोडलं क्रिकेट, घेतली तडकाफडकी निवृत्ती

अजिंक्य रहाणेला संघातून कधी बाहेर कराव?, दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दिलं उत्तर, म्हणाला…