
आयपीएल 2021 मध्ये आज दुबईत मोठी दंगल पाहायला मिळणार आहे. ही दंगल चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आहे. धोनी आणि पंत हे गुरुशिष्य जोडी आज भिडणार आहे. आज दुबईत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात चेन्नई आणि दिल्लीतून जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल. पण या मैदान-ए-जंगमध्ये कोण कोणावर विजय मिळवू शकतो हे जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही या संघांमधील आतापर्यंतची आकडेवारी घेऊन आलो आहोत, त्यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की आजच्या सामन्यात कोणाचं पारडं जड असणार आहे.

आयपीएल 2021 मध्ये आज दिल्ली आणि चेन्नई दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघांमधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला होता.

सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स आज दुसऱ्यांदा दुबईतही भिडतील. याआधी दुबईत झालेल्या दोन्ही संघांमधील सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला होता.

दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील शेवटच्या 5 सामन्यांविषयी बोलायचे झाले तर त्यातही ऋषभ पंतच्या संघाचा वरचष्मा आहे. दिल्लीने गेल्या 5 सामन्यांमध्ये 3-2 अशी बाजी मारली आहे.

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि चेन्नई हे दोन संघ आतापर्यंत 24 वेळा भिडले आहेत, या 24 पैकी 15 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर 9 सामन्यांमध्ये दिल्लीने वर्चस्व गाजवलं आहे.