IPL 2021 : रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार अबू धाबीत दाखल, सरावासाठी वाट पाहावी लागणार

| Updated on: Sep 11, 2021 | 7:09 PM

आयपीएलचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसह स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबुधाबीला पोहोचला आहे.

IPL 2021 : रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार अबू धाबीत दाखल, सरावासाठी वाट पाहावी लागणार
Follow us on

अबू धाबी : आयपीएलचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसह स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबुधाबीला पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवही अबू धाबीत दाखल झाले आहेत. हे सर्व जण इंग्लंडहून अबू धाबीला खास चार्टर्ड फ्लाइटद्वारे आले आहेत. मात्र, आता तिघांनाही 6 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. (IPL 2021: Rohit Sharma, Bumrah and Suryakumar yadav arrive in Abu Dhabi, will have to wait for practice)

फ्रेंचायझीने शनिवारी एक निवेदन जारी केले की, मुंबई इंडियन्सचे तीन सदस्य – कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव एका खासगी चार्टर विमानाने अबू धाबीला गेले. हे तिघे, त्यांच्या कुटुंबियांसह आज सकाळी अबुधाबीला पोहोचले आणि आता कोरोना प्रोटोकॉलनुसार आजपासून 6 दिवस क्वारन्टीन राहतील.

मुंबई इंडियन्सने माहिती दिली की इंग्लंडमधून उड्डाण करण्यापूर्वी सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. अबू धाबीला पोहोचल्यानंतरही खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची अबू धाबीमध्ये कोरोना चाचणी झाली, त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

आयपीएल 2021 साठी पूर्वी केलेल्या प्रोटोकॉल अंतर्गत इंग्लंडमधून येणाऱ्या खेळाडूंना 6 दिवसांच्या क्वारन्टीनमध्ये ठेवण्याच्या कालावधीपासून सूट देण्यात आली होती. कारण ते एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो बलमध्ये जात आहेत. तथापि, इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीपूर्वी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, सपोर्ट स्टाफच्या 4 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. या कारणास्तव, आयपीएलचा प्रोटोकॉल बदलण्यात आला आणि आता इंग्लंडमधून येणाऱ्या खेळाडूंनाही विलगीकरण कक्षात राहावे लागेल.

इतर बातम्या

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, टीम इंडियानं मालिका विजयाची संधी गमावली? इंग्लंडला ‘असा’ होणार फायदा

चहलला विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळाल्याने पत्नी धनश्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

(IPL 2021: Rohit Sharma, Bumrah and Suryakumar yadav arrive in Abu Dhabi, will have to wait for practice)