IPL 2022: RCB च्या कॅम्पमध्ये एबी डिव्हिलियर्सला नवा रोल, या खेळाडूच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ

| Updated on: Mar 08, 2022 | 5:44 PM

इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) चेन्नई सुपरकिंग्स (CSK) प्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (Royal Challengers Bangalore) एक वेगळी मोठी फॅन आर्मी आहे. भले RCB ने आतापर्यंत आयपीएलचे एकही जेतेपद मिळवले नसेल, पण त्यांच्या फॅन्सनी आपल्या संघाची साथ सोडलेली नाही.

IPL 2022: RCB च्या कॅम्पमध्ये एबी डिव्हिलियर्सला नवा रोल, या खेळाडूच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ
AB de Villiers - Virat Kohli (RCB)
Follow us on

मुंबई : इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) चेन्नई सुपरकिंग्स (CSK) प्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (Royal Challengers Bangalore) एक वेगळी मोठी फॅन आर्मी आहे. भले RCB ने आतापर्यंत आयपीएलचे एकही जेतेपद मिळवले नसेल, पण त्यांच्या फॅन्सनी आपल्या संघाची साथ सोडलेली नाही. विराट कोहलीच्या सर्व चाहत्यांना RCB चा संघ मनापासून आवडतो. आता विराट कोहली या संघाचा कर्णधार नाही. पण फॅन्स आजही या संघावर जीव ओवाळून टाकतात. दरम्यान, आरसीबी येत्या 12 मार्चला आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राइज देणार आहे. RCB ने मंगळवारी टि्वट करुन येत्या 12 मार्चला मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे फॅन्सनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. आरसीबीच्या टीमने अजून आपल्या कॅप्टनची घोषणा केलेली नाही. य़ा शर्यतीत फाफ डुप्लेसी आघाडीवर आहे. तर काही जण दिनेश कार्तिकचही नाव घेत आहेत.

कर्णधाराच्या नावाशिवाय RCB येत्या 12 मार्चला संघाचे नवीन नाव आणि नव्या जर्सीचीही घोषणा करु शकते. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ठेवलं जाऊ शकतं. संघाचं नाव बदलल्यानंतर आरसीबीच्या जर्सीचा रंगही बदलणार आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर एबी डिविलियर्सला एका नव्या भूमिकेत संघात स्थान देऊ शकते. डिविलियर्सने मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक म्हणून डिविलियर्स संघामध्ये आपलं योगदान देऊ शकतो. RCB येत्या 27 मार्चला आपला पहिला सामना खेळणार आहे. बँगलोरचा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे.

आतापर्यंतचे RCB चे कर्णधार?

  1. विराट कोहली – एकूण 140 सामने, 64 विजय, 69 पराभव
  2. अनिल कुंबळे – एकूण 26 सामने, 15 विजय, 11 पराभव
  3. डॅनियल व्हिटोरी – एकूण सामने 22, विजय 12, 10 पराभव
  4. राहुल द्रविड – एकूण 14 सामने, 4 विजय, 10 पराभव
  5. केविन पीटरसन – एकूण सामने 6, 2 विजय, 4 पराभव
  6. शेन वॉटसन – एकूण सामना 3, 1 विजय, 2 पराभव

इतर बातम्या

IPL 2022: जेसन रॉयच्या जागी गुजरात टायटन्सच्या ताफ्यात धडाकेबाज फलंदाजाची एंट्री, 14 चेंडूत ठोकलंय अर्धशतक

IPL फ्रँचायझी गॅसवर, दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने उडवली झोप

IPL मध्ये कोणी विकत घेतलं असतं, तेव्हाही असंच बोलला असतास का? शाकिब अल हसनवर भडकले BCB अध्यक्ष