AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR IPL 2022: CSK विरुद्धच्या मॅचआधी KKR ला मोठा झटका, 9.75 कोटीत खरेदी केलेले दोन दिग्गज पाच सामन्यांसाठी बाहेर

KKR IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त तीन दिवसांचा अवधी उरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये 26 मार्चला पहिला सामना होणार आहे.

KKR IPL 2022: CSK विरुद्धच्या मॅचआधी KKR ला मोठा झटका, 9.75 कोटीत खरेदी केलेले दोन दिग्गज पाच सामन्यांसाठी बाहेर
KKR चे दोन खेळाडू पहिले पाच सामने खेळणार नाही Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Mar 23, 2022 | 5:33 PM
Share

मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु व्हायला आता फक्त तीन दिवसांचा अवधी उरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये 26 मार्चला पहिला सामना होणार आहे. मात्र त्याआधी KKR संघाला मोठा झटका बसला आहे. कोलकाता संघाचे दोन प्रमुख खेळाडू पॅट कमिन्स आणि एरॉन फिंच हे कमीत कमी पुढचे पाच सामने खेळू शकणार नाही. कोलकाता नाइट रायडर्स टीमचे मार्गदर्शक डेविड हसी यांनी ही माहिती दिली आहे. एरॉन फिंच (Aaron Finch) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. दोघेही ऑस्ट्रेलियाच्या मर्यादीत षटकांच्या टीमचा भाग आहेत. सीरीज संपल्यानंतरच ते आयपीएलसाठी उपलब्ध होतील. पॅट कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने 7.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.

बेस प्राइसवर कोणाला विकत घेतलं?

एरॉन फिंचला एलेक्स हेल्सच्या जागी कोलकाता संघाने संधी दिली. हेल्सने बायो बबलचा कारण देऊन स्पर्धेमधून माघार घेतली. फिंचला दीड कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर केकेआरने विकत घेतलं होतं. पण तो पुढचे पाच सामने खेळू शकणार नाहीय.

क्रिकेटपटूंची प्राथमिकता कशाला असली पाहिजे?

“प्रत्येक फ्रेंचायजीला आपल्या संघातील सर्वोत्तम खेळाडू मैदानावर उतरवायचे आहेत. पण खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच प्राथमिकता असली पाहिजे. तुम्हाला नेहमी बेस्ट खेळाडू उपलब्ध हवे असतात. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्राथमिकता असली पाहिजे. प्रत्येक क्रिकेटपटूला आपल्या देशासाठी खेळायचं असतं” असं डेविड हसी वर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाला. फिंच आणि कमिन्स उपलब्ध झाल्यानंतर लगेच कोलकाता नाइट रायडर्सच्या स्क्वाडमध्ये दाखल होतील. सामन्यासाठी फिट झाल्यानंतर लगेच ते टीममध्ये दाखल होतील.

kkr ची कमकुवत बाजू कुठली?

कोलकाता नाइट रायडर्सचा कमकुवत दुवा त्यांचा विकेटकीपर आहे. या संघाकडे चांगला विकेटकीपर नाहीय. पण डेविड हसीने हे मान्य करण्यास नकार दिला. “आमच्याकडे चांगला विकेटकीपर-फलंदाज नाही, याच्याशी मी सहमत नाही. आमच्याकडे शेल्डन जॅक्सन सारखा खेळाडू आहे, जो रणजीत कमालीचा फॉर्ममध्ये आहे. तो संघासोबत बऱ्याच काळापासून आहे. आमच्याकडे सॅम बिलिंग्स सुद्धा आहे. जो इंग्लंडसाठी विकेटकीपिंग करतो. खेळाडूंकडून ते कशी चांगली कामगिरी करुन घेतात ती आता सपोर्ट स्टाफचीही जबाबदारी आहे” असे हसी म्हणाला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.