IPL 2022 Final: रेहमान यांच्यासोबत लाखभर भारतीयांनी गायलं ‘वंदे मातरम’, अंगावर शहारे आणणारा VIDEO एकदा बघाच

IPL 2022 Final: रणवीर सिंहने परफॉर्मन्स सादर केल्यानंतर एआर रहमान यांनी परफॉर्मन्स सादर केला. रेहमान यांच्यासोबत निती मोहन, मोहित चौहान यांनी सुद्धा सादरीकरण केलं.

IPL 2022 Final: रेहमान यांच्यासोबत लाखभर भारतीयांनी गायलं 'वंदे मातरम', अंगावर शहारे आणणारा VIDEO एकदा बघाच
AR Rehman performance Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 10:34 AM

मुंबई: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये काल इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या सीजनचा फायनल सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) फायनल मॅच आयोजित करण्यात आली होती. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील एक मोठं स्टेडियम आहे. एकाचवेळी 1.32 लाख क्रिकेट रसिकांना सामावून घेण्याची या स्टेडियमची क्षमता आहे. काल झालेल्या आयपीएल फायनल मॅचच्यावेळी हे स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं होतं. आयपीएल फायनल आठ वाजता सुरु झाली. पण त्याआधी 6.30 वाजता क्लोजिंग सेरेमनचा रंगारंग कार्यक्रम झाला. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमान (AR Rehman) यांनी या क्लोजिंग सेरेमनीमध्ये रंग भरले. दोघांनी दमदार परफॉर्मन्सेस सादर केले. ’83’ चित्रपटातील गाण्यावर रणवीर सिंहच्या नृत्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याने बॉलिवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरला व उपस्थितांचे मनोरंजन केलं.

आधी रणवीरचा सुपर परफॉर्मन्स

रणवीर सिंहने परफॉर्मन्स सादर केल्यानंतर एआर रहमान यांनी परफॉर्मन्स सादर केला. रेहमान यांच्यासोबत निती मोहन, मोहित चौहान यांनी सुद्धा सादरीकरण केलं. रेहमान यांनी क्लोजिंग सेरेमनीमध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील गाजलेलं ‘जय हो’ गाणं सादर केलं. त्याचवेळी त्यांनी ‘वंदे मातरम’ हे गाण सुद्धा गायलं. रेहमान जेव्हा कुठल्याही कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ गाणं सादर करतात, त्यावेळी तो कार्यक्रम एका वेगळया उंचीवर जातो. मनात देशभक्तीची भावना जागृत होते. उर अभिमानाने भरुन येतो.

गीत ऐकून अंगावर शहारे आले

काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेव्हा एआर रेहमान, निती मोहन आणि मोहित चौहान यांनी हे गाणं सादर केलं. त्यावेळी सुद्धा असचं वातावरण होतं. कालचा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. रेहमान यांच्या सूरात सूर मिसळून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षकही ‘वंदे मातरम’ गाणं म्हणत होते. हे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून आयपीएलने हा व्हिडिओ टि्वट केला आहे. रेहमान यांच्यासोबत लाखभर भारतीयांना ‘वंदे मातरम’ गीत गाताना ऐकून अंगावर शहारे येतात.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.