AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepak Chahar Fitness: दीपक चाहरच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट, कधीपर्यंत वाट पहायची ते CSK ने केलं स्पष्ट

Deepak Chahar Fitness: विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा संघ (CSK) येत्या 26 मार्चला आयपीएलमधील आपला दबदबा कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

Deepak Chahar Fitness: दीपक चाहरच्या फिटनेसबद्दल महत्त्वाची अपडेट, कधीपर्यंत वाट पहायची ते CSK ने केलं स्पष्ट
दुखापतग्रस्त दीपक चाहर Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 23, 2022 | 4:57 PM
Share

मुंबई: विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा संघ (CSK) येत्या 26 मार्चला आयपीएलमधील आपला दबदबा कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. यंदाचा 15 वा सीजन असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये होणार आहे. CSK ने मागच्या सीजनमध्ये KKR ला फायनलसह तीन सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. नेहमीप्रमाणे यंदाही एमएस धोनीचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण यंदाच्या सीजनमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे नुकसान होऊ शकते. चेन्नईला सर्वात जास्त चिंता आहे ती, वेगवान गोलंदाज दीपक चाहरची. (Deepak Chahar Fitness)चेन्नईचा हा स्टार गोलंदाज अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी NCA मध्ये आहे.

कधी दुखापत झाली?

दीपक चाहरला मागच्या महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 सीरीज दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. त्यावेळी तो षटक अर्ध्यावर सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्येही खेळू शकला नाही. बंगळुरुत NCA मध्ये दीपक चाहरच्या फिटनेसवर काम सुरु आहे. पण अजून तो पूर्णपणे फिट झालेला नाही.

चाहर तेव्हाच खेळू शकतो

भारतीय क्रिकेट बोर्डाकडून मंजुरी मिळेपर्यंत दीपक चाहरला एनसीएमध्ये राहून आपल्या फिटनेसवर काम करावं लागेल. त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. “बीसीसीआय दीपक चाहरला फिट घोषित करत नाही, तो पर्यंत तो NCA मध्ये रहाणार आहे” असे CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी पीटीआयला सांगितलं.

मागच्या सीजनमध्ये किती विकेट घेतल्या होत्या?

मागच्या सीजनमध्ये CSK च्या यशामध्ये दीपक चाहरने महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्याने 15 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. कोलकात्याविरुद्धच्या तीन सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. त्याची हीच कामगिरी लक्षात घेऊन चेन्नईने दीपक चाहरला मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांना विकत घेतलं. पण सध्या दीपकच्या दुखापतीने सीएसकेचं टेन्शन वाढवलं आहे. सुरुवातीच्या पावरप्लेच्या षटकांमध्ये विकेट काढून धाव गतीला लगाम घालण्याच्या सीएसकेच्या रणनितीला हा एक मोठा झटका आहे.

अजून एक प्रमुख खेळाडू पहिल्या सामन्यात खेळणार नाही

फक्त चाहरचं नाही, तर CSK आपल्या आणखी एका प्रमुख खेळाडूशिवाय पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला अजून भारतात येण्यासाठी वीजा मिळालेला नाही. त्यामुळे अजूनपर्यंत तो इंग्लंडमध्येच आहे. मोईन अलीला CSK ने आठ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.