IPL 2022: कर्ण शर्मा RCB कडे, त्यामुळे विजेतेपदाची चावी त्यांच्याकडे, तुम्ही म्हणालं कसं काय? त्यासाठी ही बातमी वाचा

IPL 2022: कर्ण शर्मा RCB कडे, त्यामुळे विजेतेपदाची चावी त्यांच्याकडे, तुम्ही म्हणालं कसं काय? त्यासाठी ही बातमी वाचा
RCB
Image Credit source: social media

IPL 2022: तुम्ही म्हणाला कर्ण शर्माकडे विजयाची चावी कशी काय? तो तर या सीजनमध्ये RCB साठी एकही सामना खेळलेला नाही.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 23, 2022 | 10:10 AM

मुंबई: IPL 2022 चा हा शेवटचा आठवडा आहे. उद्यापासून प्लेऑफचे सामने सुरु होतील. लीग स्टेज काल समाप्त झाली. पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये शेवटचा सामना खेळला गेला. दोन्ही टीम्स प्लेऑफच्या शर्यतीत नव्हत्या. त्यामुळे हा सामना फक्त औपचारिकता मात्र होता. 10 पैकी चार टीम्स प्लेऑफसाठी पात्र ठरल्या आहेत. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal challengers Banglore) या चार टीम्समध्ये आयपीएल चॅम्पियन बनण्याची चुरस असेल. बँगलोरला हा चान्स नशिबाने मिळालाय, असं आपण म्हणू शकतो. कारण मुंबई इंडियन्सची टीम दिल्ली कॅपिटल्स विरोधात हरली असती, RCB ला चान्स मिळाला नसता. आरसीबीची टीम आता प्लेऑफमध्ये असून विजयाची चावी कर्ण शर्माकडे (Karn Sharma) आहे, ज्याला आरसीबीने 50 लाख रुपये खर्च करुन विकत घेतलं आहे.

कर्ण शर्माकडे विजयाची चावी कशी काय?

तुम्ही म्हणाला कर्ण शर्माकडे विजयाची चावी कशी काय? तो तर या सीजनमध्ये RCB साठी एकही सामना खेळलेला नाही. कर्ण शर्मा खेळो अथवा न खळो, पण आयपीएल चॅम्पियन बनण्याचा अनुभव त्याच्याकडेच सर्वात जास्त आहे. कर्ण शर्मा ज्या टीममधून खेळलाय, त्यातील बहुतांश संघ आयपीएल चॅम्पियन बनले आहेत. कर्ण शर्मा एका खेळाडूपेक्षा लकी चार्म जास्त ठरलाय. यावेळी तो लकी चार्म RCB कडे आहे.

IPL जिंकण्याची चावी RCB कडे

जर-तरच्या गणितातून आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. हा संघ तुम्हाला 29 मे रोजी फायनलमध्ये खेळताना दिसला, त्यानंतर त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण या संघाकडे कर्ण शर्मा आहे. RCB ला प्लेऑफचं तिकिट नशिबाने मिळालं आहे. यात लक फॅक्टर आहे. कर्ण शर्मा बँगलोरच्या टीमचा तोच फॅक्टर आहे.

कर्ण शर्मा कधी, कुठल्या संघांसाठी लकी फॅक्टर ठरला?

कर्ण शर्मा आणि IPL जेतेपदाचं कनेक्शन समजून घ्या. 2016 मध्ये कर्ण शर्मा सनरायजर्स हैदराबाद संघाबरोबर होता. त्यावर्षी हैदराबादनं जेतेपद पटकावलं. 2017 मध्ये तो मुंबईच्या संघात आला, मुंबईची टीम चॅम्पियन बनली. 2018, 2021 मध्ये कर्ण शर्मा चेन्नईच्या संघात होता. त्या वर्षी चेन्नईच्या टीमने आयपीएलचे जेतेपद पटकावलं. आता तो RCB च्या टीमकडे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें