Marathi News » Photo gallery » MI vs DC IPL 2022 After Mumbai Indians win over delhi capitals celebration at Royal challengers banglore camp
MI vs DC IPL 2022: मुंबईच्या विजयानंतर RCB च्या कॅम्पमध्ये जल्लोष, विराटचा डान्स, पहा Inside Photos
MI vs DC IPL 2022: काल IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सला फार फरक पडला नाही. कारण त्यांचं स्पर्धेतली आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं.
काल IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सला फार फरक पडला नाही. कारण त्यांचं स्पर्धेतली आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं.
1 / 10
पण मुंबईच्या विजयामुळे दिल्लीचं प्लेऑफच स्वप्न संपुष्टात आलं. मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यावर आणखी एक संघ लक्ष ठेवून होता. तो म्हणजे RCB.
2 / 10
कारण काल दिल्ली जिंकली असती, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं आव्हान संपुष्टात आलं असतं. दिल्ली आणि आरसीबीचे समान गुण झाले असते. अशावेळी चांगल्या रनरेटच्या आधारावर दिल्लीची टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय झाली असती.
3 / 10
त्यामुळे मुंबई आणि दिल्लीचा सामना सुरु असताना आरसीबीचे खेळाडू, तमाम चाहते मुंबईच्या विजयाची प्रार्थन करत होते. त्यांची प्रार्थना सुद्धा फळाला आली.
4 / 10
टिम डेविडच्या स्फोटक खेळीमुळे मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. दिल्लीचं 160 धावांचं टार्गेट शेवटच्या षटकात पार केलं.
5 / 10
मुंबई इंडियन्सने दिल्लीवर विजय मिळवताच RCB च्या कॅम्पमध्ये एकच जल्लोष झाला. मुंबईच्या विजयानंतर आरसीबीने जोरदार सेलिब्रेशन केलं.
6 / 10
आरसीबीने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात विराट कोहली स्वत: नाचताना दिसतोय.
7 / 10
सामना सुरु असतानाही आरसीबीचे सर्व खेळाडू एकत्र जमून ही मॅच पाहत होते. आरसीबीने तो फोटो सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता.
8 / 10
प्लेऑफमध्ये आरसीबीचाा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. लखनौची टीम तिसऱ्या आणि आरसीबी चौथ्या स्थानावर आहे.
9 / 10
एलिमिनेटर मध्ये हरणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार नाही. त्यांचा क्वालिफायर 1 आणि 2 म्हणजे गुजरात आणि राजस्थानमधील विजेत्या बरोबर त्यांना खेळावं लागेल.