PBKS vs SRH IPL 2022:चौकार मारल्यानंतर भुवनेश्वरने धवनला टाकला खतरनाक चेंडू, वेदनेने विव्हळत शिखर खाली कोसळला

PBKS vs SRH IPL 2022: शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये दोघे परस्परांच्या विरोधात खेळतात.

PBKS vs SRH IPL 2022:चौकार मारल्यानंतर भुवनेश्वरने धवनला टाकला खतरनाक चेंडू, वेदनेने विव्हळत शिखर खाली कोसळला
भुवनेश्वर कुमार
Image Credit source: IPL Screegrab
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 17, 2022 | 4:39 PM

मुंबई: शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये दोघे परस्परांच्या विरोधात खेळतात. आज भुवी आणि धवन आमने-सामने आले, त्यावेळी असं काही पहायला मिळालं की, ज्याची अपेक्षा कोणी केली नसेल. मयंक अग्रवालला दुखापत झाल्यामुळे शिखर धवन पंजाब किंग्सचं (Punjab kings) नेतृत्व करत आहे. आज शिखर धवनने तिसऱ्याच चेंडूवर पुढे येऊन भुवनेश्वरला चौकार लगावला. त्यानंतर भुवनेश्वरनेही लगेच पलटवार केला. भुवनेश्वरने टाकलेला पुढचाच चेंडू धवनला जोरात लागला. तो वेदनेने विव्हळत खाली कोसळला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं काय झालं? भुवीने धवनला कुठला चेंडू टाकला?

चेंडू इतका जोरात लागला की….

पहिल्याच षटकात भुवनेश्वरचा चेंडू धवनच्या एब्डॉमिनल गार्डला लागला. हा चेंडू इतका जोरात लागला की, धवन वेदनेने विव्हळत खाली बसला. पंजाब किंग्सचे फिजियो लगेच मैदानात धावत आले. त्यांनी प्राथमिक उपचार केले व धवनला पाणी पिण्यासाठी दिलं.

गुड लेंग्थवर टाकलेल्या चेंडूने धवनला चकवलं

पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धवनने भुवनेश्वरला शानदार चौकार खेचला. चेंडू पायात टाकला होता. धवनने स्टेपआऊट होऊन चौकार लगावला. त्यानंतर भुवीने कमबॅक केलं. त्याने गुड लेंग्थवर टाकलेल्या चेंडूने धवनला चकवलं. हा बॉल सरळ बॉक्सवर येऊन लागला. त्यानंतर धवन वेदनेने विव्हळला. धवनला बॉल इतका जोरात लागला की, पाच मिनिट खेळ थांबवावा लागला. धवन रिटायर्ड हर्ट होईल असं वाटलं. पण त्याने फलंदाजी सुरु ठेवली.

धवनचा सूर हरवला

चेंडू लागल्यानंतर धवनचा सूर हरवला. तो स्वस्तात 8 धावांवर OUT झाला. पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखरने मार्को जॅनसेनकडे सोपा झेल दिला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें