IPL 2022: DC vs RR मॅचमध्ये राडा, वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या चीटर-चीटरच्या घोषणा, पहा VIDEO

| Updated on: Apr 23, 2022 | 12:03 PM

IPL 2022 DC vs RR: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Rajasthan Royals vs Delhi Capitals) शुक्रवारी झालेला IPL 2022 मधला सामना खेळापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत आहे.

IPL 2022: DC vs RR मॅचमध्ये राडा, वानखेडेवर प्रेक्षकांनी दिल्या चीटर-चीटरच्या घोषणा, पहा VIDEO
DC vs RR Wankhede stadium
Follow us on

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (Rajasthan Royals vs Delhi Capitals) शुक्रवारी झालेला IPL 2022 मधला सामना खेळापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत आहे. सामनाच्या शेवटच्या षटकातील नो-बॉल (No ball) या सर्व वादाचे मूळ कारण आहे. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. रोव्हमॅन पॉवेल (Rovman powell) स्ट्राइकवर होता. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले. त्यामुळे दिल्लीच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. पण त्यावरुन बराच वाद झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या मते चेंडू कमरेच्या वर होता. त्यामुळे पंचांनी हा नो-बॉल द्यावा, असं त्यांचं मत होतं. स्ट्राइक वर असलेल्या रोव्हमॅन पॉवेलने नो-बॉल का दिला नाही? म्हणून अंपायरकडे विचारणा केली. अंपायरने नो बॉल दिला नाही. म्हणून दिल्लीचा संघ नाराज होता. या सामन्यादरम्यान मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी सुद्धा जे वर्तन केलं, ज्याची चर्चा सुरु आहे.

दिल्लीच्या संघाने जोरदार प्रयत्न केले, पण….

दिल्ली हा सामना जिंकू शकली नाही. राजस्थानने त्यांना 15 धावांनी हरवलं. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या 116 धावांच्या बळावर 20 षटकात दोन विकेट गमावून 222 धावा केल्या. दिल्लीच्या संघाने जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना 207 धावाच करता आल्या.

दुसऱ्या कोचने ऋषभची कानउघडणी केली

नो बॉलवरुन दिल्लीचा संघ पंचांशी हुज्जत घालत होता. पॉवेल आणि कुलदीप मैदानावरील पंचांना हा नो-बॉल का नाही? म्हणून विचारणा करत होते. दिल्लीचे सहाय्यक कोच प्रवीण आमरे सुद्धा मैदानावर पंचांशी बोलण्याासठी आले होते. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने खेळाडूंना माघारी पॅव्हेलियनमध्ये बोलावलं होतं. पण दुसरे सहाय्यक कोच शेन वॅटसनने ऋषभची कानउघडणी केली. त्यानंतर पंत शांत झाला. तिसऱ्या अंपायरकडे विचारणा केली पाहिजे, असं दिल्लीच्या टीमचं मत होतं. मैदानावर हा सर्व ड्रामा सुरु असताना स्टँडमध्ये बसलेले प्रेक्षक जोर-जोरात चीटर-चीटरच्या घोषणा देत होते. अंपायरने तिसऱ्या अंपायरची मदत घेतली नाही. कारण नियम या गोष्टीची परवानगी देत नाही.

ऋषभ पंत सामना संपल्यानंतर काय म्हणाला…

सामना संपल्यानंतर पंतने या वादावर आपली बाजू मांडली. “त्यांनी संपूर्ण सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण अखेरीस पॉवेलने संधी दिली. नो बॉल खूप महत्त्वाचा ठरला असता. मी निराश आहे. पण या बद्दल जास्त काही बोलू शकत नाहीस. मैदानावर उपस्थित प्रत्येकाने हा बॉल बघितला. तिसऱ्या पंचांनी या मध्ये हस्तक्षेप करणं गरजेच होतं. कारण हा नो बॉल होता”