AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Who is Yash dayal: मुंबई इंडियन्सने धुडकावलेल्या यशचा आज Gujarat Titans कडून डेब्यू, कोण आहे तो?

IPL 2022 Who is Yash dayal: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये (RR vs GT) सामना सुरु आहे.

IPL 2022 Who is Yash dayal: मुंबई इंडियन्सने धुडकावलेल्या यशचा आज Gujarat Titans कडून डेब्यू, कोण आहे तो?
यश दयाल गुजरात टायटन्सकडून डेब्यू Image Credit source: instagram
| Updated on: Apr 14, 2022 | 8:40 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये (RR vs GT) सामना सुरु आहे. दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघ टॉप फॉर्ममध्ये आहेत. हार्दिक आणि संजूच्या टीमने प्रत्येकी तीन सामने जिंकेल आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक मॅच गमावली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील विजेता संघ गुणतालिकेत टॉपवर पोहोचेल. गुजरातने आजच्या सामन्यासाठी संघात एकमेव बदल केला आहे. त्याच्याबद्दल फॅन्सना जास्त माहित नाहीय. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash dayal) गुजरात टायटन्सकडून आज डेब्यु केला. गुजरातचे गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी यश डेब्यु करताना गुजरात टायटन्सची कॅप दिली. यश दयालला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक मोठा मंच मिळाला आहे.

यश कुठल्या राज्याकडून खेळतो?

यश दयाल उत्तर प्रदेशकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो. यशने 14 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 50 विकेट मिळवल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 23 आणि टी 20 मध्ये 15 विकेट आहेत.

यशला त्याच्या मेहनतीच फळ मिळालं

विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करुन यशने फ्रेंचायजीचं लक्ष वेधून घेतलं होतं. यूपीच्या या गोलंदाजाने सात सामन्यात 14 विकेट घेतल्या. तो टॉप पाच गोलंदाजांमध्ये होता. यश दयाल मागच्या तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ट्रायल देत होता. मुंबई इंडियन्सनेही या वेगवान गोलंदाजाला रिजेक्ट केलं. पण आयपीएल 2022 मध्ये यशला त्याच्या मेहनतीच फळ मिळालं. गुजरात टायटन्सने 3.20 कोटी रुपयांची बोली लावून या वेगवान गोलंदाजाला विकत घेतलं.

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....