IPL 2023 CSK vs DC Dream 11 : चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यातील हे खेळाडू तुम्हाला करतील मालामाल, कोण आहे यादीत पाहा

| Updated on: May 10, 2023 | 12:58 PM

आयपीएल 2023 स्पर्धेतील 55 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. चेन्नईचं होम ग्राउंड एमए चिंदबरम मैदानात हा सामना खेळला जाणार आहे.

IPL 2023 CSK vs DC Dream 11 : चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यातील हे खेळाडू तुम्हाला करतील मालामाल, कोण आहे यादीत पाहा
IPL 2023 CSK vs DC Dream 11 : चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यात हे खेळाडू कमवून देतील पैसा, वाचा
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबईला मागच्या सामन्यात मात दिली होती. तर दिल्लीने आरसीबीला मागच्या सामन्यात पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे आजच्या कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. चेन्नईचं प्लेऑपच्या दिशेने एक पाऊल पडलं आहे. तर दिल्ली सर्वच्या सर्व सामने महत्त्वाचे आहेत. दिल्लीने आजचा सामना जिंकला नाही तर स्पर्धेतून बाहेर असेल.

तुम्ही ड्रीम इलेव्हन टीम बनवत असाल, तर तुम्हाला मदत होईल. तुम्ही चांगले खेळाडू निवडून कमाई करू शकता. चला जाणून घेऊयात आजच्या सामन्यात ड्रीम इलेव्हन टीम काय असू शकते.

पिच रिपोर्ट

चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना एम ए चिंदबरम मैदानात होत आहे. मागच्या या सामन्यात या मैदानावर मोठी धावसंख्या उभी राहिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही मोठी धावसंख्या होईल. या मैदानावर स्पिनर्सना खूप मदत मिळते. दोन्हीकडून फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरेल.

चेन्नई आणि दिल्लीची ड्रीम 11

  • विकेटकीपर – फील सॉल्ट
  • फलंदाज – डेविड वॉर्नर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे (उपकर्णधार), अंबाती रायुडू
  • अष्टपैलू – मोइन अली, मिशेल मार्श
  • गोलंदाज- कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, महेश तीक्षणा

चेन्नई आणि दिल्ली संभाव्य प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान

दोन्ही संघाचा संपूर्ण स्क्वॉड

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.