
मुंबई : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये फायनंल सामना पार पडणार आहे. आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी, संघांनी अनेक रेकॉर्ड रचले. यंदाही आयपीएल 2023 ची फायनल खेळत संघाला दुसऱ्यांदा चॅम्पिअन होण्याची संधी आहे. सर्व संघांमध्ये हा संघ सर्वात संतुलित वाटला, त्याप्रमाणे सर्व खेळाडूंनी आपली भूमिका चोख बजावली. महत्त्वाचं म्हणजे गुजरात संघाच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकच संघाचे तीन खेळाडू पर्पल कॅपच्या रेसमध्ये आहेत.
आयपीएलच्या इतिहासात एकाच संघातील तीन गोलंदाजांनी 20 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सचे गोलंदाज मोहम्मद शमी, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी मिळून हा विक्रम केला आहे. या तिन्ही गोलंदाजांनी आयपीएलच्या 16व्या हंगामात 20 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत आणि सध्या हे तिघेही पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 3 मध्ये आहेत.
IPL 2023 मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मोहम्मद शमी आहे, त्याने 28 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर या यादीत दुसरे नाव अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान असून 27 विकेट्स घेतल्या आहेत. मोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत.
एका संघाच्या तीन खेळाडूंनी 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. तर गुजरात टायटन्ससाठी नूर अहमद 12 सामन्यात 14 बळी घेणारा चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. गुजरातला यश मिळवून देण्यामागे गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.