AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Captaincy : IPL आधी सर्वात मोठी बातमी, कर्णधाराच्या दुखापतीमुळे युवा खेळाडूला लॉटरी, थेट कर्णधारपदाची जबाबदारी

आयपीएल 2023 च्या हंगामाला सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी असताना मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधाराच्या दुखापतीमुळे युवा खेळाडूला लॉटरी लागली असून थेट कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे.

Captaincy : IPL आधी सर्वात मोठी बातमी, कर्णधाराच्या दुखापतीमुळे युवा खेळाडूला लॉटरी, थेट कर्णधारपदाची जबाबदारी
ipl 2023
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 27, 2023 | 7:00 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 च्या हंगामाला सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी असताना मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेअस अय्यर दुखापती असल्याने त्याच्या जागी कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी नितीश राणाकडे सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यर याला दोनवेळा दुखापतीमुळे कर्णधआरपद गमवावं लागलं आहे. मात्र केकेआरच्या या निर्णयाने सर्वांना चकित केलं आहे.

शाहरुख खानची टीम आंद्रे रसेल, सुनील नरेन किंवा टिम साऊदी यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी जाईल असं बोललं जात होतं. मात्र श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरच्या व्यवस्थापनाने नितीश राणावर विश्वास ठेवला आहे. केकेआरने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

नितीशने 11 मे 2016 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध आयपीएलमधील पहिला सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 91 सामने खेळले असून 27.96 च्या सरासरीने 2,181 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 134.22 आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीतमध्ये त्याने आतापर्यंत 15 अर्धशतकांसह 190 चौकार आणि 111 षटकार मारले आहेत. आयपीएलमधील त्याची सर्वाधिक धावसंख्या 87 धावा आहे.

कोलकाता नाईट रायडर्स अंतिम संघ: श्रेयस अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगदीश, अरविंद अरविंद, वरुण चक्रवर्ती. , सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, शाकिब अल हसन.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?