IPL 2023 CSK vs DC : अजिंक्य रहाणे याचा दिल्लीच्या खेळाडूने घेतला अफलातून कॅच, पाहा Video

ललित यादव याने घेतलेला झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ललित याने अजिंक्य रहाणे याचा कडक कॅच घेतला.

IPL 2023 CSK vs DC : अजिंक्य रहाणे याचा दिल्लीच्या खेळाडूने घेतला अफलातून कॅच, पाहा Video
| Updated on: May 10, 2023 | 11:31 PM

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. यामध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावत 167 धावा केल्या होत्या. दिल्लीला या लक्ष्याचा काही पाठलाग करता आला नाही. चेन्नईने हा सामना जिंकत प्ले ऑफमधील आपलं स्थान पक्क केलं आहे. या सामन्यामध्ये दिल्लीचा खेळाडू ललित यादव याने अजिंक्य रहाणे याचा कडक कॅच घेतला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

ललित यादव याने घेतलेला झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ललित यादवच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने अतिशय जोरात शॉट खेळला, पण दिल्ली कॅपिटल्सच्या ललितने एक अफलातून कॅच घेतला. सुरूवातील सर्वांना वाटलं चेंडू फक्त आडवला आहे मात्र यादव आनंद व्यक्त करू लागल्यावर सर्वांच्या लक्षात आलं. ललितने तत्परता दाखवत उजवीकडे डुबकी मारली. त्याची वेळ अचूक होती आणि चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या दोन बोटांमध्ये आणि अंगठ्यामध्ये अडकला.

चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड 24 तर अम्बाती रायडूने 23 धावा केल्या. एम एस धोनीनेही 2 षटकार आणि 1 चौकार मारत 20 धावा केल्या.

चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान