IPL 2023 : MI vs CSK | रोहित शर्मा याने सिक्स मारला पण धोनीने काही सांगितलं अन् झाला क्लीन बोर्ड

कर्णधार रोहित शर्माने चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवलं खरं पण चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडेने रोहितला क्लीन बोल्ड केलं.

IPL 2023 : MI vs CSK | रोहित शर्मा याने सिक्स मारला पण धोनीने काही सांगितलं अन् झाला क्लीन बोर्ड
| Updated on: Apr 08, 2023 | 8:42 PM

मुंबई : आयपीएलमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू आहे. क्रीडा विश्व या सामन्याची वाट पाहत होतं तो सामना सुरू असून सीएसकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने आक्रमक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्माने चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवलं खरं पण चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडेने रोहितला क्लीन बोल्ड केलं.

रोहित शर्माने चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर तुषारला एक सिक्सर मारला होता. त्यानंतर त्याने कमबॅक केलं. रोहितला बॉल समजलाच नाही आणि स्टम्पवर जाऊन आदळला. रोहित शर्माने 13 चेंडूत 23 धावा केल्या यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार मारला.

 

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ