AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : रोहित शर्मा याने अखेर ती गोष्ट मान्य केलीच, पराभवाबाबत केलं मोठं वक्तव्य

सामना हरल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहितने नेमका कोणत्या कारणांमुळे मुंबईच्या हातातून हा सामना गेला याबाबत सांगितलं आहे.

MI vs CSK : रोहित शर्मा याने अखेर ती गोष्ट मान्य केलीच, पराभवाबाबत केलं मोठं वक्तव्य
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 09, 2023 | 4:12 AM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यामध्ये मुंबईचा 7 विकेट्सने पराभव झाला आहे. मुंबईचा या पराभवासह यंदाच्या पर्वातील दुसरा पराभव झाला आहे. सामना हरल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहितने नेमका कोणत्या कारणांमुळे मुंबईच्या हातातून हा सामना गेला याबाबत सांगितलं आहे.

मुंबईच्या पराभवावर काय म्हणाला रोहित?

आम्ही मध्येच चाचपडलो, मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा काहीच उपयोग करता आला नाही. आम्हाला 30-40 धावा कमी पडल्या आणि मधल्या षटकांचा फायदा घेता आला नाही. सीएसकेच्या फिरकीपटूंना श्रेय द्यावे लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला दडपणाखाली ठेवले. आमच्याकडे काही युवा खेळाडू आहेत आणि त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल कारण त्यांच्याकडे प्रतिभा असल्याचं म्हणत रोहित संघातील युवा खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला. आता फक्त दोन सामने झाले आहेत त्यामुळे आम्ही नव्याने सुरुवात करू, असंही रोहित शर्मा याने म्हटलं आहे.

मुंबई संघाने एकदम झकास सुरूवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चौकार षटकार मार आक्रमक सुरूवात करून दिली होती. रोहितला तुषार देशपांडेने बोल्ड आऊट केलं. त्यानंतर ईशान बाद झाला आणि मुंबईचं गणित बिघडलं. मुंबईचा यंदाच्या पर्वातील हा सलग दुसरा पराभव आहे.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...