AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : रविंद्र जडेजाने ‘हा’ कॅच नसता घेतला तर भर सामन्यात बोलवावी लागली असती रूग्णवाहिका, पाहा Video

रविंद्र जडेजा याने आपल्याच बॉलिंगवर जो कॅच घेतला तो जर नसता घेतला तर रूग्णवाहिका आणावी लागली असती. नेमकं असं काय घडलं होतं?

MI vs CSK : रविंद्र जडेजाने 'हा' कॅच नसता घेतला तर भर सामन्यात बोलवावी लागली असती रूग्णवाहिका, पाहा Video
| Updated on: Apr 08, 2023 | 9:16 PM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये मुंबईमधील वानखेडे स्टेडिअमवर सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईची सुरूवात खराब झाली असून 10 ओव्हरच्या आतमध्ये अर्धा संघ तंबूत परतला आहे. सामन्यामध्ये एक घटना घडली ती म्हणजे रविंद्र जडेजा याने आपल्याच बॉलिंगवर जो कॅच घेतला तो जर नसता घेतला तर रूग्णवाहिका आणावी लागली असती. नेमकं असं काय घडलं होतं?

मुंबईचा रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मुंबईने सर्वाधिक पैसे खर्च केलेला खेळाडू ग्रीन आणि तिलक वर्मा मैदानात होते. दोघे सावधपणे खेळत होते, त्यावेळी ग्रीनने जडेजाच्या चेंडूवर जोरात फटका मारला. चेंडू इतका जोरात होता की समोर जडेजाने हात फक्त वर केले तेव्हा त्याच्या एकदम हातात जावून बसला. जर त्या ठिकाणी जडेजा नसता तर स्टम्पजवळ असलेल्या पंचांना लागला असता. हा चेंडू काही फक्त लागला नसता त्यांना मोठी इजाही झाली असती. कारण ग्रीनने चेंडूच तितक्या वेगाने मारला होता.

पाहा व्हिडीओ- 

रविंद्र जडेजाच्या हिमतीला दाद द्यावी लागेल कारण इतर दुसरा कोणता खेळाडू असता तर वाटत नाही त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता. जडेजाने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावांचं लक्ष्य सीएसकेला दिलं आहे. मुंबईचा संघ या लक्ष्यापासून सीएसकेला रोखण्यासाठी काय योजना आखतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  त्यासोबतच सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे इम्पॅक्ट खेळाडूमध्ये अर्जुनला संधा मिळते याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....