AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : आयपीएलमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये रचणाऱ्या शतकवीर सूर्याचा शेवटचा सिक्स, पाहा व्हिडीओ

सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील नंबर वनचा फलंदाज बनला आहे. मात्र आयपीएलमध्ये सूर्याचं एकही शतक झालं नव्हतं याची खंत सर्व चाहत्यांच्या मनात होती. शुक्रवारी सूर्याने आपल्या करिअरमधील पहिलंवहिलं शतक केलं.

IPL 2023 : आयपीएलमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये रचणाऱ्या शतकवीर सूर्याचा शेवटचा सिक्स, पाहा व्हिडीओ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 13, 2023 | 10:04 AM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव याने गुजरातविरूद्ध दमदार शतक ठोकलं. वानखेडे मैदानावर सूर्याचं वादळ आलेलं पाहायला मिळालं. पलटणच्या खेळाडूंनी सांघिक कामगिरी करत 27 धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील नंबर वनचा फलंदाज बनला आहे. मात्र आयपीएलमध्ये सूर्याचं एकही शतक झालं नव्हतं याची खंत सर्व चाहत्यांच्या मनात होती. शुक्रवारी सूर्याने आपल्या करिअरमधील पहिलंवहिलं शतक केलं.

सूर्यकुमार याच्या शतकानंतर वानखेडे मैदानावर सर्वांनी सूर्याला नमस्कार केला. रोहित शर्मा आणि आकाश अम्बानी यांनीसुद्धा त्याला नमस्कार केलेला पाहायला मिळाला. सूर्याने अनेकवेळा 60 पेक्षा जास्त धावा केल्या मात्र त्याला शतक करता आलं नव्हतं. सूर्यकुमार 2011 पासून आयपीएल खेळतोय. 2012 मध्ये डेब्यू केला, 2013 मध्ये एकही मॅच खेळायला मिळालं नाही. पुढची सगळी वर्ष खेळला. टेक्निकली 12 वर्ष तो खेळतोय.

पाहा व्हिडीओ-

सूर्यकुमार यादव याने शतक ठोकत मुंबई इंडियन्सची गेल्या 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मुंबई इंडियन्सकडून तब्बल 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच फलंदाजांने शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने ही कामगिरी करुन दाखवली. सूर्याच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पहिलवहिलं शतक आहे.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या म्हणजे हायस्कोअर करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. मुंबईकडून सनथ जयसूर्या याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 114 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याने 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नॉट आऊट 109 रन्स केल्या. तर आता सूर्याने 49 बॉलमध्ये नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल