AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma IPL 2023 | मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का लागला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

Rohit Sharma IPL 2023 | मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर
| Updated on: Apr 16, 2023 | 4:47 PM
Share

मुंबई | मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 22 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध घरच्या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा बाहेर झाला आहे.

नक्की काय झालं?

टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात आले. केकेआरकडून नितीश राणा आला. तर मुंबईकडून रोहित शर्मा येणार असं अपेक्षित होतं. मात्र ऐनवेळेस सूर्यकुमार यादव मैदानात आला. त्यामुळे पलटणच्या चाहत्यांना धक्का बसला. सूर्याने टॉस जिंकल्यानंतर रोहित हा दुखापतीमुळे खेळत नसल्याचं त्याने सांगितलं.

सूर्यावर दुप्पट जबाबदारी

सूर्यकुमार यादव याची आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याच्यावर कर्णधार म्हणून अधिकची जबाबदारी आहे. सूर्याला गेल्या अनेक सामन्यांपासून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सूर्याला काही सामन्यांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे सुर्या आता नेतृत्वाची जबाबदारी कशी सांभाळतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल.

मुंबई केकेआरवर वरचढ

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यां हे दोन्ही संघ एकूण 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने केकेआरला तब्बल 22 वेळा पराभूत केलंय. तर कोलकाताने मुंबईवर 9 वेळा विजय मिळवला आहे. मात्र गेल्या 3 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईवर वरचढ राहिली आहे. केकेआरने मुंबईवर गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात आता काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकात नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच