IPL 2023 MI vs SRH Dream 11 : प्लेऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्स समोरची दोन समीकरणं कुठली?

| Updated on: May 21, 2023 | 11:38 AM

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Dream 11 Prediction IPL 2023 : रनरेटच्या शर्यतीत RCB ला मागे टाकणं मुंबई इंडियन्ससाठी सोपं नसेल. त्यासाठी मुंबईला SRH वर मोठा विजय मिळवावा लागेल.

IPL 2023 MI vs SRH Dream 11 :  प्लेऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्स समोरची दोन समीकरणं कुठली?
Mumbai Indians IPL 2023
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : IPL 2023 चा सीजन खूप उत्कंठावर्धक आहे. ग्रुप स्टेजचे शेवटचे दोन सामने आज होतील. पण साखळी गटातील शेवटचा सामना होईपर्यंत प्लेऑफची चुरस कायम आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये आज मॅच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होईल. सनरायजर्स हैदराबादचा प्लेऑफशी काही संबंध नाहीय. पण मुंबई इंडियन्ससाठी ही मॅच खूप महत्वाची आहे.

मुंबई इंडियन्ससाठी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना महत्वाचा आहे. कारण त्यांच्या प्लेऑफच्या आशा या मॅचवर टिकून आहेत. मुंबईला काहीही करुन ही मॅच जिंकावीच लागेल. कारण पराभव झाल्यास त्यांच टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात येईल.

मुंबई तेव्हाच प्लेऑफमध्ये जाईल

IPL 2023 च्या पॉइंट्स टॅलीमध्ये मुंबई इंडियन्सचे सध्या 14 पॉइंट्स आहेत. त्यांनी सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं, तर त्यांचे एकूण 16 पॉइंट्स होतील. जिंकूनही प्लेऑफचा मार्ग क्लियर नसेल. मुंबईच्या विजयानंतर RCB गुजरात टायटन्स विरुद्ध हरली, तर मुंबईची टीम प्लेऑफमध्ये जाईल.

मुंबईच्या विजयाच दुसरं समीकरण काय?

वरती सांगितलेलं, मुंबई इंडियन्सच प्लेऑफमध्ये जाण्याच हे एक सोपं समीकरण आहे. दुसरा मार्ग सुद्धा आहे. मुंबई इंडियन्सला सनरायजर्स हैदराबादवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. म्हणजे RCB ने गुजरातवर विजय मिळवल्यास नेट रनरेटमध्ये मुंबई सरस ठरली पाहिजे. दोन्ही टीमसाठी जय-पराजयाच गणित जवळपास सारखं आहे. पण रनरेटच्या बाबतीत RCB मुंबईच्या पुढे आहे.

विजयाच अंतर किती हवं?

RCB च्या रनरेटच्या पुढे जाणं, मुंबई इंडियन्ससाठी सोपं नसेल. त्यासाठी मुंबईला मोठ्या फरकाने जिंकाव लागेल. उदहारणार्थ, म्हणजे RCB ने 1 रन्सने मॅच जिंकली, तर मुंबई इंडियन्ससाठी विजयाच अंतर 79 धावा हवं.

SRH च्या कॅप्टनने काय म्हटलय?

सनरायजर्स हैदराबादच्या कॅप्टनने आम्ही आत्मसन्मानासाठी खेळू असं आधीच जाहीर केलय. त्यामुळे मुंबईसाठी सोपं नसेल. मुंबई इंडियन्स सुद्धा सहजासहजी हार मानणार नाही.

MI vs SRH: Dream 11 Prediction

मुंबई आणि सनरायजर्स मॅचसाठी तुम्ही ड्रीम इलेव्हनचा विचार करत असाल, तर या खेळाडूंची निवड करु शकता.

कीपर- इशान किशन, हेनरिख क्लासेन

फलंदाज- सूर्यकुमार यादव (कॅप्टन), टिम डेविड (उपकर्णधार), एडेन मारक्रम, रोहित शर्मा

ऑलराऊंडर्स- कॅमरुन ग्रीन, अभिषेक शर्मा

गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, पीयूष चावला, जेसन बेहरनड्रॉर्फ