AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs LSG : MS Dhoni विजयानंतर चिडला, इम्पॅक्ट प्लेयरवर काढला राग, फोटो व्हायरल

CSK vs LSG IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवूनही धोनीच स्वत:वरील नियंत्रण सुटलं. धोनीच चिडणं, रागावण स्वाभाविक होतं. विजयानंतरही स्वत:च्या कमकुवत बाजूंवर लक्ष देणारे फार कमी असतात.

CSK vs LSG : MS Dhoni विजयानंतर चिडला, इम्पॅक्ट प्लेयरवर काढला राग, फोटो व्हायरल
CSK Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 04, 2023 | 9:49 AM
Share

CSK vs LSG IPL 2023 : विजयानंतर कॅप्टन खूश होतो. पण लखनौ सुपर जायंट्सला हरवल्यानतंर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन एमएस धोनी चिडल्याच दिसलं. त्याचा राग पूर्ण टीमवर नाही, तर आपल्या गोलंदाजांवर होता. खासकरुन इम्पॅक्ट प्लेयर बनलेल्या एका गोलंदाजावर जास्त राग दिसला. टीम परफॉर्मन्समध्ये हा खेळाडू आपला प्रभाव सोडण्यात कमी पडला. आम्ही बोलतोय तृषार देशपांडेबद्दल. मॅचनंतर धोनी तृषारवर चिडल्याच दिसलं.

तृषार देशपांडेने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 45 धावा देऊन 2 विकेट काढल्या. त्याच्या कामगिरीवर धोनी चिडला नव्हता. पण तो जी चूक वारंवार करत होता, त्यावर धोनी चिडला होता. मॅचमधील निर्णायक लास्ट ओव्हरमध्ये सुद्धा तृषार तीच चूक करत होता.

या चूकीमुळे धोनी वैतागला

लास्ट ओव्हरमध्ये लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 28 धावांची आवश्यकता होती. CSK चा कॅप्टन धोनीने तृषार देशपांडेच्या हाती चेंडू सोपवला. त्याने पहिला चेंडू वाइड टाकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो-बॉल टाकला. लखनौच्या टीमला लेगबायचा 1 रन्स मिळाला. त्यामुळे लखनौच्या टीमसमोरील लक्ष्य आणखी कमी झालं.

त्यानंतर तृषारने काय केलं?

त्यानंतर तृषारने एकही एक्स्ट्रा चेंडू टाकला नाही. त्याने बदोनीचा विकेट घेतला. 12 धावांनी लखनौ सुपर जायंट्सचा पराभव झाला. पण या ओव्हरच्या सुरुवातीला तृषारने जी चूक केली, त्याची नाराजी धोनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. 4 ओव्हर 4 वाइड आणि 3 नो बॉल

धोनी तृषारवर चिडला, त्यामागे त्याने लास्ट ओव्हरमध्ये केलेली चूक हे एकमेव कारण नव्हतं. त्याआधी सुद्धा त्याने 2 नो बॉल आणि 3 वाइड चेंडू टाकले. त्याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 4 वाइट आणि 3 नो बॉल टाकले. त्यामुळेच धोनी तृषारवर चिडला होता. तृषार देशपांडे CSK च नाही, IPL 2023 मधील पहिला इम्पॅक्ट प्लेयर आहे. लखनौ विरुद्धच्या मॅचमध्येही तो याच रोलमध्ये खेळत होता.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.