Abdul Samad IPL 2023 : लास्ट बॉलवर SIX मारुन जिंकून देणाऱ्या समदच्या डोक्यात त्यावेळी काय चाललेलं? VIDEO

| Updated on: May 08, 2023 | 1:13 PM

Abdul Samad IPL 2023 : कोणाला विश्वास नव्हता, ते अब्दुल समदने लास्ट बॉलवर करुन दाखवलं. लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 17 रन्स हवे होते, तेव्हा तुझ्या डोक्यात काय चाललेलं? असा प्रश्न अब्दुल समदला विचारण्यात आला.

Abdul Samad IPL 2023 : लास्ट बॉलवर SIX मारुन जिंकून देणाऱ्या समदच्या डोक्यात त्यावेळी काय चाललेलं? VIDEO
Abdul samad-Umran Malik
Image Credit source: IPL
Follow us on

जयपूर : आज क्रिकेट विश्वात अब्दुल समदच्या नावाची चर्चा आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन त्याने सनरायजर्स हैदराबादला विजय मिळवून दिला. समदने संदीप शर्माच्या अखेरच्या चेंडूवर सिक्स मारुन जे काम करुन दाखवलं, ते खरोखर कठीण होतं. अशक्य ते शक्य करुन दाखवल्यानंतर अब्दुल समदने आपल्या सहकारी खेळाडूंना वेड म्हटलं. तो, सीरियसली नाही, मस्करीमध्ये सहकारी खेळाडूंना वेडा म्हणाला.

मॅच संपल्यानंतर हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने अब्दुल समद बरोबर खास चर्चा केली. “मी 8-9 केक ऑर्डर केलेत, तुम्ही विचार करा, आता समद सोबत काय होईल” असं उमरान म्हणाला. “मी हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर माझ्या रुममध्ये पळून जाणार. कारण सगळेच उमरानसारखे येडे आहेत” असं अब्दुल समद म्हणाला.

लास्ट ओव्हरमध्ये समदच्या डोक्यात काय चाललेलं?

लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 17 रन्स हवे होते, तेव्हा तुझ्या डोक्यात काय चाललेलं? असा प्रश्न अब्दुल समदला विचारण्यात आला. त्यावर, टीमला विजय मिळवून देणं, हेच आपल एकमेव लक्ष्य होतं, असं उत्तर त्याने दिले. “बॅटिंग करताना, मी स्लॉट चेंडूंची प्रतिक्षा करत होतो. शेवटपर्यंत मी मारता येईल, अशा चेंडूची प्रतिक्षा करत होतो” अखेर असं घडलं. हवा तसा चेंडू मिळाला, त्यावर त्याने सिक्स मारला.

त्यावेळी शक्य झालं नव्हतं

“याआधी दोनवेळा मला टीमला विजय मिळवून देण्याची संधी मिळाली होती. पण त्यावेळी शक्य झालं नाही. त्यामुळे मी निराश होतो” असं समद म्हणाला. “प्रत्येक मॅच तुम्ही फिनिश करु शकत नाही. पण बेस्ट प्रदर्शन करणं तुमच्या हातात आहे” असं समदने सांगितलं.

असा मिळवून दिला चमत्कारिक विजय

“मी जेव्हा बॅटिंगसाठी उतरलो, तेव्हा परिस्थिती सोपी नव्हती. ग्लेन फिलिप्सने तीन सिक्स मारुन टीमच्या विजयाची आस निर्माण केली” असं समदने सांगितलं. समदच्या मते फिलिप्सचा मॅचचा गेम चेंजर आहे. लास्ट ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी 17 धावांची गरज होती. समदने दुसऱ्या चेंडूवर संदीपला सिक्स मारला.


अखेरच्या चेंडूवर हैदराबादला 5 रन्स हव्या होत्या. संदीपने लास्ट बॉल यॉर्कर टाकला. पण तो नो-बॉल होता. समदला नशिबाची साथ मिळाली. त्यानंतर लास्ट बॉलवर सिक्स मारुन थरारक सामन्यात त्याने हैदराबादला विजय मिळवून दिला.