AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : RCB च्या टीममध्ये नव्या खेळाडूची एंट्री, पैशांसाठी देश सोडला, धर्म बदलून इस्लामचा स्वीकार

IPL 2023 RCB News : 2016 साली मॉडेल बरोबर त्याने मशिदीत निकाह केला. त्याने वयाच्या 26 व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. 2021 मध्ये हा खेळाडू परत आला. त्याच्यासह आणखी एका भारतीय खेळाडूची RCB टीममध्ये एन्ट्री.

IPL 2023 : RCB च्या टीममध्ये नव्या खेळाडूची एंट्री, पैशांसाठी देश सोडला, धर्म बदलून इस्लामचा स्वीकार
new player in rcb teamImage Credit source: instagram
| Updated on: Apr 07, 2023 | 2:54 PM
Share

IPL 2023 RCB News : आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन डिसेंबरमध्ये झालं. त्यावेळी एका प्लेयरवर कोणी बोली लावली नाही. आता त्या प्लेयरला अचानक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये स्थान मिळालय. आरसीबीच्या टीममधून रीस टॉप्ली बाहेर गेलाय. त्याच्याजागी या खेळाडूची निवड करण्यात आलीय. रीस टॉप्लीला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्याचा खांदा दुखावला होता. आता रीस टॉप्लीच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाची RCB टीममध्ये एंट्री झालीय.

आरसीबी टीमचा गुरुवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सामन्यात पराभव झाला. आज दक्षिण आफ्रिकेच्या वेन पार्नेलची टीममध्ये निवड झालीय. रीस टॉप्लीच्या जागी तो खेळणार आहे.

कोण आहे वेन पार्नेल?

वेन पार्नेल दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. हा खेळाडू व्हाइट बॉल क्रिकेटचा स्पेशलिस्ट मानला जातो. पार्नेलने 73 वनडे मॅचेसमध्ये 99 विकेट काढलेत. टी 20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्या नावावर 59 विकेट आहेत. पार्नेल आपल्या करियरमध्ये एकूण 257 टी 20 सामने खेळलाय. यात त्याने 259 विकेट घेतल्या आहेत. वेन पार्नेल 2017 साली दक्षिण आफ्रिका सोडून इंग्लंडला गेला.

कोलपॅक डील

पार्नेलने कोलपॅक डील साइन केली होती. त्यासाठी त्याने वयाच्या 26 व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. 2021 मध्ये हा खेळाडू परत आला. पार्नेल आता दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि टी 20 टीमचा भाग आहे. धर्म परिवर्तन करुन इस्लाम स्वीकारला

वेन पार्नेलने आपला धर्म बदललाय. पार्नेलने वयाच्या 22 व्या वर्षी आपल्या वाढिदवशी धर्म परिवर्तन केलं. पार्नेल इस्लाम धर्म स्वीकारला. वर्ष 2016 मध्ये पार्नेलने मॉडेल आएशा बाकर बरोबर लग्न केलं. दोघांनी मशिदीत निकाह केलं. पार्नेलसोबत RCB च्या टीममध्ये वैशाख विजय कुमारची सुद्धा एंट्री झालीय. त्याचा रजत पाटीदारच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलाय. विजय कुमार वेगवान गोलंदाज आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.