AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023, KKR vs RCB | आरसीबी फिरकीच्या जाळ्यात, केकेआरच्या गोलंदाजाची विजयासह ऐतिहासिक कामगिरी

यपीएलच्या 16 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला आहे. शार्दुल ठाकूरने या सामन्यातून आपली छाप सोडली.

IPL 2023, KKR vs RCB | आरसीबी फिरकीच्या जाळ्यात, केकेआरच्या गोलंदाजाची विजयासह ऐतिहासिक कामगिरी
| Updated on: Apr 06, 2023 | 11:31 PM
Share

कोलकाता | कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या होम ग्राउंड इडन गार्डनवर आयपीएल 16 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. कोलकाताने आरसीबीवर 81 धावांनी मात केली आहे. कोलतातने आरसीबीला विजयासाठी 205 धावाचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी आरसीबीला 123 धावांवर ऑलआऊट केलं. आरसीबीचा हा या हंगामातील पहिला पराभव ठरला. आरसीबीरकडून फॅफ डु प्लेसिस याने सर्वाधिक 23 रन्स केल्या. विराटने 21 धावा जोडल्या.  डेव्हिड व्हिली याने नाबाद 20 धावा केल्या.  मायकल ब्रेसवेल याने 19 रन्सचं योगदान दिलं. आकाश दीपने 17 रन्स केल्या  केकेआरकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सुयश शर्मा  याने  3 विकेट्स घेतल्या. सुनील नरेन याने 2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.  तर शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.

कोलकाताच्या फिरकी गोलंदाजांची ऐतिहासिकी कामगिरी

फिरकी गोलंदाजांचा धमाका

कोलकाताने आरसीबीला ऑलआऊट केलं.  या 10 पैकी 9 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.  यासह कोलकाताच्या गोलंदाजांनी इतिहास रचला. आयपीएलच्या कोणत्याही एका सामन्यात फिरकी गोलंदाजांनी 9 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.  यामध्ये वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मात्र सुनील नरेन आणि सुयश शर्मा या दोघांनीही दुसऱ्या बाजूने विकेट घेत आरसीबीला बॅक फूटवर ढकलण्याचं काम केलं.

कोलकाताची बॅटिंग

दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. ओपनर रहमनुल्लाह गुरुबाज याने 57 रन्सची खेळी केली. तर रिंकू सिंह याने 46 रन्सचं योगदान दिलं.

शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. हीच शतकी भागीदारी ही निर्णायक ठरली.  या भागीदारीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावरच आरसीबीला विजयासाठी 205 धावांचं डोंगराएवढं आव्हान देता आलं. रसीबीकडून कर्ण शर्मा आणि डेव्हिज विली या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि ब्रेसवल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.