AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 SRH Vs LSG : हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्यात पुन्हा पंगा, झालं असं की सामना थांबवावा लागला Watch Video

सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण मागच्या काही सामन्यात लखनऊचा संघ आणि वाद पाहायला मिळाला आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही असंच चित्र होतं.

IPL 2023 SRH Vs LSG : हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामन्यात पुन्हा पंगा, झालं असं की सामना थांबवावा लागला Watch Video
IPL 2023 SRH Vs LSG : भर मैदानात काय झालं! सामना थांबवण्याचा पंचांनी घेतला निर्णय, पुढे काय झालं पाहा VideoImage Credit source: Twitter
| Updated on: May 13, 2023 | 6:05 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. गुतालिकेत लखनऊचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानावर आहे. पण हैदराबादचे एकूण चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्यांनाही प्लेऑफची संधी आहे. असा हा महत्त्वपूर्ण सामना सुरु असताना पहिल्या इनिंगच्या 19 व्या षटकात गालबोट लागलं. इतकंच काय तर पंचांना हा सामना काही मिनिटांसाठी थांबवावा लागला. पोलिसांनाही यावेळी प्रेक्षक गॅलरीत यावं लागलं. पण नेमकं काय झालं याबाबत कोणालाच कल्पना नाही.

हैदराबादचा फलंदाज क्लासेन आक्रमक फलंदाजी करत असताना नो बॉलवरून पंचांशी थोडासा वाद झाला. पंचांनी नो बॉल दिल्यानंतर लखनऊने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी नो नसल्याचं सांगितलं. त्यामुळे हैदराबादचे चाहते भडकले.  इतकंच काय चाहत्यांनी कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या. लखनऊ सुपर जायंट्सचे खेळाडू मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांमधून कोहली कोहलीचा जयघोष सुरु होता. तसेच खेळाडूवर काहीतरी फेकल्याचं समालोचक सांगत होते. मात्र यात किती तथ्य हे अद्याप स्पष्ट नाही.

गोंधळ पाहून पंचांनी पुढे येत हा सामना काही काळासाठी थांबवला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी एन्ट्री घेतली. त्यानंतर काही मिनिटांनी सामना पुन्हा सुरु करण्यात आला. या प्रकरणाचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लखनऊचे नवीन उल हक, गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा वाद सर्वश्रूत आहे. त्यात आजच्या सामन्यातही नवीन उल हकला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला या वादाची किनार असावी असं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. यासह हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 182 धावा केल्या. तसेच लखनऊसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हेन्रीच क्लासेन आणि अनमोलप्रीत सिंह यांनी चांगली फलंदाजी केली.

दोन्ही संघांचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल