IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात होणार मोठा उलटफेर! गुणतालिकेत पडणार जबरदस्त फरक

| Updated on: May 07, 2024 | 5:00 PM

आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. अजूनही कोणताच संघ अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये पोहोचलेला नाही. पण कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित आहे. त्यामुळे उर्वरित दोन संघांसाठी जोरदार रस्सीखेच आहे.

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यात होणार मोठा उलटफेर! गुणतालिकेत पडणार जबरदस्त फरक
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 57वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना या सामन्यातील विजय खूपच महत्त्वाचा आहे. कारण सामन्यात जयपराजय प्लेऑफचं गणित ठरवणार आहे. बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्टीरय मैदानात हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. मात्र या सामन्यापूर्वी हवामानाबाबत एक अपडेट समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं टेन्शन वाढलं आहे.हैदराबादमध्ये सध्या ढगाळ वातावरणआहे. तसेच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी आकाश निरभ्र असेल. मात्र सामना सुरु होण्याच्या 90 मिनिटाआधी पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी 6 वाजता पाऊस पडू शकतो. पाऊस पडेल असा 32टक्के अंदाज बांधला गेला आहे. तर पाऊस पडला तर मात्र सामना रद्द किंवा उशिराने सुरु होऊ शकतो. आयपीएल 2023 स्पर्धेतही पावसाने हजेरी लावली होती. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात पाऊस पडल्याने प्रत्येकी एक गुण वाटून दिला होता.

सनरायझर्स हैदराबादचा संघ 11 सामन्यात 6 विजयांसह गुणातालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादचे 12 गुण असून नेट रनरेट -0.065 इतकाआहे. तर लखनौ सुपर जायंट्सही 11 पैकी 6 सामन्यात विजय मिळवत 12 गुण आणि -0.371 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे जो संघ सामना जिंकेल त्याची वर्णी थेट तिसऱ्या क्रमांकावर लागणार आहे. पण पावसामुळे सामना रद्द झाला तर प्रत्येकी एक गुण वाटून दिला जाईल. त्यामुळे 13 गुणांसह हैदराबादचा संघ तिसऱ्या, लखनौचा संघ चौथ्या स्थानावर येईल. तर चेन्नई सुपर किंग्स संघ पाचव्या स्थानावर फेकला जाईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

सनरायझर्स हैदराबादः  टी नटराजन, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग , अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, एडन मार्कराम, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, सुब्रमण्यन, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, आकाश महाराज सिंग.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसीन खान, यश ठाकूर, अर्शीन कुलकर्णी, मनिमारण , कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग चरक, देवदत्त पडिक्कल, अर्शद खान, प्रेरक मांकड, मयंक यादव, अमित मिश्रा, काइल मेयर्स, क्विंटन डी कॉक, मॅट हेन्री, शामर जोसेफ.