
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं. या सामन्यासाठी मुंबई आणि बंगळुरु या दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
मुंबई इंडियन्सने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या वर्ल्ड कप विनर अनुभवी खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हार्दिकने पियूष चावला याला बाहेर बसवलं आहे. तर श्रेयल गोपाळ याला संधी दिली आहे. टीम इंडियाने 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पियूष चावला या वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3 बदल केले आहेत. विल जॅक्स याने पदार्पण केलं आहे. विल जॅक्स याला ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर महिपाल लोमरुर आणि विजयकुमार वैशाख या दोघांची एन्ट्री झाली आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एकूण 32 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबई आरसीबीवर वरचढ ठरली आहे. मुंबईने आरसीबीला 32 पैकी 18 सामन्यात पराभूत केलं आहे. तर आरसीबीने पलटणला 14 सामन्यात पराभूत केलंय.
मुंबईचे 11 शिलेदार
𝚃𝙴𝙰𝙼 𝙽𝙴𝚆𝚂 𝙸𝚂 𝙸𝙽 📜
Shreyas Gopal starts in this massive face-off 💪🌪️#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvRCB | @Dream11 pic.twitter.com/ga9ms2Ht90
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.