IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपवर या गोलंदाजाची एकहाती सत्ता, टॉप 5 मध्ये कोण?

Purple Cap IPL 2024 : आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. तसेच स्पर्धेदरम्यान गोलंदाजांच्या कामगिरीनुसार या पर्पल कॅपची अदलाबादल होत असते.

IPL 2024 Purple Cap : पर्पल कॅपवर या गोलंदाजाची एकहाती सत्ता, टॉप 5 मध्ये कोण?
| Updated on: Mar 28, 2024 | 12:09 AM

हैदराबादने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील ट्रेंड कायम ठेवला आहे. हैदराबादने या हंगामातील आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 31 धावांनी मात करत या हंगमातील आणि घरच्या मैदानातील पहिला विजय मिळवला आहे. याआधीच्या सातही सामन्यात होम टीमचाच विजय झाला आहे. हैदराबादने विजय मिळवला. मात्र त्यांना मोठी धावसंख्या करुनही मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात अपयश आलं. मुंबईने विजयासाठी मिळालेल्या 278 धावांच्या प्रत्युत्तरात 5 विकेट्स गमावून 246 धावांपर्यंत मजल मारली.

आठ सामन्यानंतर पर्पल कॅप कुणाची?

हैदराबादच्या विजयानंतर ऑरेंज कॅप होल्डर बदलला आहे. तर पर्पल कॅपवर चेन्नईच्या गोलंदाजाने एकहाती सत्ता कायम राखली आहे. हैदराबादच्या हेनरिक क्लासेन याने मुंबई विरुद्ध 80 धावांची खेळी केली. हेनरिक याने यासह विराट कोहली याला मागे टाकत ऑरेँज कॅप पटकावली. तर चेन्नईचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्याकडेच पर्पल कॅप कायम आहे. तसेच हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेताही मुंबईचा जसप्रीत बुमराह टॉप 5 मध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे.

हैदराबादचा 17 व्या हंगामातील पहिला विजय

मुस्तफिजुर रहमान 2 सामन्यात 6 विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकावरील गोलंदाजांच्या नावावर प्रत्येकी 3 विकेट्स आहेत. मात्र इकॉनॉमी रेटच्या आधारे हे गोलंदाज दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. तर पाचव्या क्रमांकावरील गोलंदाजाच्या नावावर 1 सामन्यात 3 विकेट्स आहेत. हरप्रीत ब्ररार, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा आणि टी नटराजन हे चोघे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

गोलंदाजसामनेइकॉनोमीविकेट्स
मुस्तफिझुर रहमान38.83 7
मयंक यादव35.126
युजवेंद्र चहल35.506
मोहित शर्मा37.756
खलील अहमद48.186

हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.

मुंबई प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि क्वेना माफाका.