IPL 2024, CSK vs LSG : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या या खेळाडूंकडे विजयाची चावी! जाणून घ्या

| Updated on: Apr 22, 2024 | 3:27 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 39वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांना विजय खूपच महत्त्वाचा आहे. प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी दोन गुणांच्या कमाईसोबत नेट रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे. चला जाणून घेऊया या सामन्यातील महत्त्वाच्या खेळाडूंबाबत

IPL 2024, CSK vs LSG : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या या खेळाडूंकडे विजयाची चावी! जाणून घ्या
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना 23 एप्रिल रोजी रंगणार आहे. मागच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 विकेट्स राखून पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी चेन्नई सुपर किंग्सकडे आहे.चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ चारवेळा आमनेसामने आले आहेत. यात लखनौ सुपर जायंट्सने 2, तर चेन्नई सुपर किंग्सने एकदा विजय मिळवला आहे. तर एक सामना निकालाविना सुटला आहे. चेपॉक येथील खेळपट्टी फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे गोलंदाजीतील व्हेरियशन वापरू शकतात. खेळपट्टीवर तुलनेने कमी उसळी असल्याने फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करणे आव्हानात्मक वाटेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.

चेन्नई सुपर किंग्सच्या सहा, तर लखनौ सुपर जायंट्सच्या पाच खेळाडूंवर खास नजर असेल. या 11 खेळाडूंमध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या क्विंटन डीकॉक, केएल राहुल, निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस आणि रवि बिष्णोई या खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. तर चेन्नई सुपर किंग्सकडून शिवम दुबे, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मुस्तफिझुर रहमान आणि मथीशा पथिराना चांगली कामगिरी करू शकतात.रहमान प्रत्येक सामन्यात एक तरी विकेट घेत आहे. त्यामुळे पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. तर शिवम दुबे फलंदाजीतून कमाल करताना दिसत आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स : अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान. इम्पॅक्ट प्लेयर – मथीशा पाथिराना

लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर. इम्पॅक्ट प्लेयर – कृष्णप्पा गौथम.