AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 CSK vs RR Live Streaming : चेन्नईसाठी ‘करो या मरो’, राजस्थान प्लेऑफचं तिकीट मिळवणार?

Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Streaming : चेन्नई सुपर किंग्ससाठी हा आरपारचा सामना असणार आहे.तर राजस्थान विजयासह प्लेऑफ निश्चित करेल.

IPL 2024 CSK vs RR Live Streaming : चेन्नईसाठी 'करो या मरो', राजस्थान प्लेऑफचं तिकीट मिळवणार?
M S Dhoni and Sanju Samson CSK vs RR,Image Credit source: BCCI/IPL
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 11, 2024 | 6:54 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड याच्याकडे असणार आहे. तर संजू सॅमसन राजस्थानची धुरा सांभाळणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. चेन्नईने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर राजस्थानने 11 पैकी 8 सामने जिंकलेत. राजस्थान 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता चेन्नई सामना जिंकून आव्हान कायम ठेवतं की राजस्थान तिकीट कन्फर्म करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना केव्हा?

चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना रविवारी 12 मे रोजी होणार आहे.

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना कुठे?

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, अरावेली अविनाश, समीर रिझवी, मुकेश चौधरी, रिचर्ड ग्लीसन, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर , निशांत सिंधू आणि महेश तीक्षाना.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, जोस बटलर, कुलदीप सेन, तनुष कोटियन कोहलर-कॅडमोर, कुणाल सिंग राठोड, नवदीप सैनी, केशव महाराज, शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, ध्रुव जुरेल आणि आबिद मुश्ताक.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद