IPL 2024, CSK vs RR : राजस्थानने चेन्नईसमोर ठेवलं 142 धावांचं सोपं आव्हान, कोण मारणार बाजी?

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकल्याचं दिसून आलं. कारण राजस्थान चेन्नईसमोर मोठं आव्हान देण्यास अपयश ठरला. चेन्नईला 120 चेंडूत धावा करायच्या आहेत.

IPL 2024, CSK vs RR : राजस्थानने चेन्नईसमोर ठेवलं 142 धावांचं सोपं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2024 | 5:11 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्याकडे खासकरून आरसीबीचं लक्ष लागून आहे. चेन्नईने हा सामना गमवल्यास आरसीबीला फायदा होऊ शकतो. मात्र जिंकल्यास आरसीबीचं प्लेऑफचं गणित फिस्कटू शकतं. दरम्यान या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला. राजस्थानने खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय काही अंशी चुकला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण या खेळपट्टीवर राजस्थानकडून हव्या तशा धावा झाल्या नाहीत. त्यामुळे होमग्राउंडवर चेन्नई आरामात दिलेलं आव्हान पूर्ण करेल अशी शक्यता आहे. चेन्नईने हा सामना जिंकला तर प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकेल. दुसरीकडे राजस्थानला प्लेऑफसाठी आणखी एका विजयाची वाट पाहावी लागणार आहे. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये ही जोडी काही खास करू शकली नाही.

यशस्वी जयस्वाल 24 धावांवर असताना सिमरजीत सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर जोस बटलर 21 धावांवर असताना त्याला तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनही सिमरजीच्या जाळ्यात अडकला आणि ऋतुराज गायकवाडच्या हाती झेल देऊन बसला.रियान परागने ध्रुव जुरेलच्या साथीने धावांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथपर्यंत बराच षटकांचा टप्पा संपला होता. एकंदरीत या खेळपट्टीवर चेंडू थांबत बॅटवर येत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे फलंदाज फटका मारताना चुकत असल्याचं दिसून आलं. तुषार देशपांडेने शेवटचं षटक टाकलं या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ध्रुव जुरेल षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र चेंडू खूपच वर चढला आणि झेल बाद होत तंबूत परतला. शुभम दुबेही आला तसा तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल