IPL 2024, DC vs GT : दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सच्या या खेळाडूंचा असेल वरचष्मा, प्लेइंग 11 आणि पिच रिपोर्ट समजून घ्या

| Updated on: Apr 16, 2024 | 3:49 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. सामन्यातील पराभव दोन्ही पैकी एका संघाचा प्लेऑफचा मार्ग खडतर करणार आहे. या सामन्यात काही खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. चला जाणून घेऊयात त्याबाबत

IPL 2024, DC vs GT : दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सच्या या खेळाडूंचा असेल वरचष्मा, प्लेइंग 11 आणि पिच रिपोर्ट समजून घ्या
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफची लढत आता चुरशीची होत चालली आहे. प्रत्येक सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. त्यामुळे गुणांची रेस सुरु असल्याने प्रत्येक सामन्यांचं इथून पुढे महत्त्व वाढलं आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील 32वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यात गुजरात टायटन्सने 2, तर दिल्ली कॅपिटल्सने एक सामना जिंकला आहे. गुजरातचा दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम स्कोअर हा 171 आहे. दिल्लीचा गुजरातसमोर सर्वोत्तम स्कोअर हा 162 इतक आहे. या दोन्ही संघांची पाठची आकडेवारी पाहता सामना तूल्यबल होणार यात शंका नाही. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे 6 आणि गुजरात टायटन्सचे 5 खेळाडू कमाल करतील.

दिल्ली कॅपिटल्सकडून डेविड वॉर्नर, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि एनरिक नोर्त्जे या खेळाडूंवर नजर असेल. तर गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल, राशीद खान, डेविड मिलर, जोशुआ लिटल आणि केन विल्यमसन यांच्याकडून अपेक्षा आहेत. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे खूपच मोठं आहे. इथली खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना एकसारखी मदत करणारी आहे. या मैदानात काळ्या आणि लाल अशा दोन प्रकारच्या खेळपट्ट्या आहेत.काळ्या खेळपट्टीला जास्त भेगा दिसून येतात तसेच धीमी असून फिरकीपटूंना मदत करते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार) , साई सुदर्शन , मॅथ्यू वेड (विकेटकीपर) , अझमतुल्ला ओमरझाई , जोशुआ लिटल , शाहरुख खान, राहुल तेवतिया , रशीद खान , स्पेन्सर जॉन्सन , नूर अहमद , उमेश यादव.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर , पृथी शॉ , जेत फ्रेझर-मॅकगर्क , ऋषभ पंत (कर्णदार) , ट्रिस्टन स्टब्स , अभिषेक पोरेल , अक्षर पटेल , एनरिक नॉर्त्जे , ललित यादव , मुकेश कुमार , खलिल अहमद.