
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या धारदार गोलंदाजांसमोर हैदराबादचं पॅकअप झालं आहे. हैदराबादला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. कॅप्टन पॅट कमिन्स आणि एडन मारक्रम या दोघांनी केलेल्या 20 प्लस रन्समुळे हैदराबादला 100 पार मजल मारता आली. त्यामुळे केकेआरला विजयासाठी 114 धावांचं आव्हान मिळालं आहे. हैदराबादचा डाव हा 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर आटोपला. त्यामुळे आता केकेआर 114 धावांचा यशस्वी पाठलाग करते की हैदराबाद या धावांचा बचाव करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
हैदराबादकडून एकूण चौघांना दुहेरी आणि दोघांना किमान 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या. हैदराबादसाठी कॅप्टन पॅट कमिन्स याने सर्वाधिक 24 धावांची खेळी केली. पॅटच्या या खेळीमुळे हैदाबादला 100 पार पोहचता आलं. पॅटने 19 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 24 धावा केल्या. एडन मारक्रम याने 23 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. हेन्रिक क्लासेन याने 17 बॉलमध्ये 16 रन्स केल्या. तर नितीश रेड्डीने 10 चेंडूत 13 धावा केल्या. ट्रेव्हि हेड याने निर्णायक सामन्यात निराशा केली. हेड गोल्डन डक ठरला.
हैदराबादच्या 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. राहुल त्रिपाठी 9, शहबाज अहमद 8, जयदेव उनाडकट आणि अब्दुल समद या दोघांनी प्रत्येकी 4-4 आणि अभिषेक शर्मा याने 2 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार झिरोवर नॉट आऊट राहिला. केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर वैभर अरोरा, सुनील नरीन आमि वरुण चक्रवर्थी या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
हैदराबादचं पॅकअप
Innings Break!
A relentless bowling effort in the #Final from Kolkata Knight Riders 👏👏
A 🎯 of 1️⃣1️⃣4️⃣ to achieve glory🏆
Can #SRH turn things around things around with the ball? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/lCK6AJCdH9#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/DLqIvWQoKf
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग ईलेव्हन: श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट खेळाडू: अनुकूल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: पॅट कमिन्स (कॅर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.