MI vs GT Dream 11 | मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स मॅचसाठी लावा ही ड्रीम 11, होताल मालामाल

| Updated on: Mar 24, 2024 | 7:17 PM

GT vs MI Dream 11 IPL 2024 : आयपीएलमधील दोन तगडे संघ काही वेळात एकमेकांविरोधात भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघामध्ये कोणते खेळाडू आज ड्रीम 11 मध्ये सर्वाधिक अंक मिळवील जाणून घ्या.

MI vs GT Dream 11 | मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स मॅचसाठी लावा ही ड्रीम 11, होताल मालामाल
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये पार पडणार आहे. क्रीडा चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अवघ्या काही वेळात सामन्याला सुरूवात होणार आहे. आता या सामन्याआधी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होवू शकते.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. ज्या संघाला एकदा चॅम्पियन आणि दुसऱ्यांदा फायनलमध्ये आपल्या नेतृत्वात घेऊन जाणारा हार्दिक पंड्या गुजरातविरूद्ध कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. दोन वर्षे संघाचा कॅप्टन राहिलेल्या हार्दिक पंड्याला प्रत्येक खेळाडूची पारख असणार आहे. याचा फायदा मुंबई इंडियन्स संघाला आजच्या सामन्यात होणार आहे.

शुबमन गिलकडे गुजरात संघाच्या नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली आहे. संघातील मोठे खेळाडू शुबमनसाठी मार्गदर्शन करताना दिसतील. मात्र मोहम्मद शमी याची जागा भरून काढण्यासाठी गुजरात उमेश यादव याला संघात जागी देऊ शकतं. ड्रीम 11 साठी खाली असलेला संघ तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.

GT vs MI Dream 11 : बॅट्समन- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, टीम डेव्हिस, डेव्हिड मिलर, कीपर– इशान किशन, ऑल राऊंडर – राशिद खान (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, बॉलर – जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, उमेश यादव

मुंबई वि. गुजरात हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई आणि गुजरात आतापर्यंत चारवेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांचे दोन विजय आणि दोन पराभव झाले आहेत. आता पाचव्यांदा  दोन्ही संघ भिडणार असून कोणी बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (w), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेविस, क्वेना माफाका, नमन धीर

गुजरात टायटन्स संघ: शुभमन गिल (C), रिद्धिमान साहा (W), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, सुशांत मिश्रा