KKR vs RCB : कॅप्टन श्रेयसचं अर्धशतक, केकेआरची तोडू बॅटिंग, आरसीबीसमोर 223 धावांचं आव्हान

IPL 2024 KKR vs RCB 1st Innings Highlights In Marathi : कोलकाताच्या फलंदाजांनी आरसीबीच्या बॉलिंगसमोर तोडफोड बॅटिंग केली. केकेआरने आरसीबीसमोर विजयासाठी 224 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

KKR vs RCB : कॅप्टन श्रेयसचं अर्धशतक, केकेआरची तोडू बॅटिंग, आरसीबीसमोर 223 धावांचं आव्हान
shreyas iyer kkr vs rcb ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 21, 2024 | 6:04 PM

कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने टॉस गमावून 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. कोलकाताकडून कॅप्टन श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तर ओपनर फिलीप सॉल्ट याने 48 धावा केल्या. तर अखेरीस रिंकू सिंह 24, आंद्रे रसेल 27* आणि रमनदीप सिंह याने 24* धावा केल्या. तर आरसीबीकडून यश दयाल आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. आता आरसीबी या धावांचं आव्हान पूर्ण करतं की केकेआर बचाव करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

केकेआरची बॅटिंग

फिलिप सॉल्ट या ओपनर बॅट्समनने सुनील नरेनसोबत विस्फोटक बॅटिंग करुन केकेआरला शानदार सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी 56 धावा जोडल्या. त्यानंतर फिलीप सॉल्टर 14 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 चौकारांसह 48 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर टॉप ऑर्डरमधील फलंदाज फ्लॉप ठरले. सुनील नरेन 10, अंगक्रिष रघुवंशी 3 आणि वेंकटेश अय्यर 16 धावा करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर कॅप्टन श्रेयससह एकूण चौघांनी चांगली खेळी करत केकेआरला 200 पार पोहचवलं

श्रेयसने 36 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावा केल्या. रिंकू सिंग याने 16 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सह 24 धावा केल्या. तर रसेल आणि रमनदीप सिंह ही जोडी नाबाद परतली. आंद्रे रसेल याने 20 बॉलमध्ये 4 चौकारांसह नाबाद 24 धावा केल्या. तर रमनदीप सिंह याने 9 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 24 धावांचं योगदान दिलं. तर आरसीबीकडून ग्रीन आणि यश दयाल या दोघांव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि लॉरी फर्ग्यूसन यादोघांना 1-1 विकेट मिळाली.

आरसीबीसमोर 223 धावांचं आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.