IPL 2024, KKR vs RR : सामन्यानंतर श्रेयस अय्यरने असं फोडलं पराभवाचं खापर, चुकांचा पाढा वाचत म्हणाला..

| Updated on: Apr 17, 2024 | 12:04 AM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 2 गडी राखून राजस्थानने धुव्वा उडवला. तसेच गुणतालिकेतील अव्वल स्थानही कायम ठेवलं. या सामन्यातील पराभवानंतर श्रेयस अय्यर नाराज दिसला.

IPL 2024, KKR vs RR : सामन्यानंतर श्रेयस अय्यरने असं फोडलं पराभवाचं खापर, चुकांचा पाढा वाचत म्हणाला..
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला दणका दिला आहे. नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला असला तर सामन्यावर पकड मात्र कोलकात्याने मिळवली होती. मात्र जोस बटलरने कोलकात्याचं सर्व गणित फिस्कटून टाकलं. ओपनिंगला आलेल्या सुनील नरीनने राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढली. सुनील नरीनने 56 चेंडूत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. तसेच या मोठ्या खेळीमुळे 20 षटकात 6 गडी गमवून 223 धावा करता आल्या. असं असलं तरी जोस बटलरच्या खेळीपुढे सर्वकाही फिकं पडलं. सावकाश पण सातत्य ठेवत जोस बटलरने गाडी विजयाच्या वेशीवर नेली आणि विजय मिळवून दिला.

जोस बटलर वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. जोस बटलर एका बाजूने किल्ला लढवत असताना दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत होत्या. अखेर त्याने ही झुंज यशस्वी करून दाखवली आणि 2 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या पराभवानंतर राजस्थानचं गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. तर कोलकात्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल. या पराभवानंतर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर त्याने या पराभवाचं विश्लेषण आपल्या शब्दात केलं.

“हा पराभव पचवणं एका कडवट औषधासारखं आहे. अशा प्रकारे पराभव होईल वाटलं नव्हतं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. बटलर शांतपणे खेळत होता . स्पर्धेत असा पराभव सुरुवातीलाच मिळालं की त्यात सुधारणा करता येते. आम्ही यातून नक्कीच धडा घेऊ. सुनील नरीन खरंच खूप चांगला खेळला. तो आमच्या संघाची संपत्ती आहे. त्याने चांगली फटकेबाजी केली. चुकांमधून शिकलं पाहीजे आणि परतणं महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी काही दिवसांचा ब्रेक असून आम्ही त्याच ताकदीने परतू. “, असं श्रेयस अय्यर सामन्यानंतर म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.