IPL 2024 Final: 1 ट्रॉफी 2 कॅप्टन आणि 4 फोटो, पुन्हा पॅट उजव्याच बाजूला, नेटकरी म्हणतात विजेता फिक्स!

IPL 2024 Final KKR vs SRH: केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर आणि एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्स या दोघांचं फोटोशूट पार पडलं. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

IPL 2024 Final: 1 ट्रॉफी 2 कॅप्टन आणि 4 फोटो, पुन्हा पॅट उजव्याच बाजूला, नेटकरी म्हणतात विजेता फिक्स!
kkr vs srh captain photoshoot
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 25, 2024 | 7:44 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामना रविवारी 26 मे रोजी कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही कर्णधारांचं फोटोशूट पार पडलं. दोन्ही कर्णधारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच या फोटोशूटनंतर नेटकऱ्यांनी हैदराबादला विजयासाठी आधीच शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रेयस अय्यर केकेआर आणि पॅट कमिन्स एसआरएचचं नेतृत्व करणार आहे. कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी दोन्ही संघाच्या कर्णधारांचं ट्रॉफीसह फोटोशूट केलं जातं. त्यानुसार या अंतिम सामन्यासाठी फोटोशूट करण्यात आलं. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर आणि एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी बोटीत ट्रॉफीसह फोटो काढले. तसेच रिक्षातही फोटो काढले. आयपीएलच्या एक्स अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या चारही फोटोंमध्ये पॅट कमिन्स उजव्या बाजूला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी हैदराबादला तिसऱ्या आयपीएल ट्रॉफीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल सामन्याआधीच कसं काय? तर पॅट कमिन्स, अंतिम सामना आणि उजवी बाजू याचं खास कनेक्शन आहे.

श्रेयस-पॅटचं फोटोशूट

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या दोन्ही महामुकाबल्यात रोहित शर्मा याने टीम इंडियाचं आणि पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं. या दोन्ही स्पर्धेआधी उभसंघाच्या कर्णधारांचं फोटूोशूट झालं. या फोटोशूटमध्ये पॅट कमिन्स हा उजव्या बाजूला होता. ते दोन्ही सामने उजव्या बाजूला असलेल्या पॅट कमिन्सची टीम ऑस्ट्रेलियाच जिंकली. त्याच हिशोबाने आता आयपीएल 2024 फायनलआधी फोटोशूटमध्ये पॅट उजव्या बाजूने असल्याने हैदराबाद ट्रॉफी जिंकणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, चेतन साकरिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि अल्लाह गझनफर.

पॅट उजव्या बाजूला

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, उमरान मलिक आणि विजयकांत व्यासकांत.