IPL 2024, LSG vs GT : गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने पराभवासाठी या खेळाडूंना धरलं जबाबदार, स्पष्टच सांगितलं काय ते
आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचा तिसरा पराभव झाला आहे. या पराभवामुळे गुजरात गुणतालिकेत सातव्या स्थानावर राहिला आहे. यामुळे पुढे प्लेऑफची स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. लखनौला 163 धावांवर रोखूनही धावा न झाल्याने कर्णधार शुबमन गिल संतापला आहे. सामन्यानंतर त्याने काय चुका झाल्या याचा पाढा वाचला.

आयपीएल स्पर्धेतील 21 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला 163 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 164 धावा आल्या. मात्र गुजरातचा संघ 18.5 षटकात सर्वबाद 130 धावा करू शकला. यामुळे गुजरातचा 33 धावांनी पराभव झाला. याचा गुणतालिकेत नेट रनरेटवर जबरदस्त इम्पॅक्ट झाला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचा पुढचा प्रवास आणखी खडतर असणार आहे. गुजरातला स्पर्धेत आणखी नऊ सामने खेळायचे असून स्पर्धा तीव्र होणार आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या पराभवामुळे शुबमन गिल चांगलाच संतापला आहे. विजयासाठी दिलेल्या धावा सहज होऊ शकल्या असत्या असं त्याने सामन्यानंतर सांगितलं. तसेच नेमकं कुठे काय चुकलं याचा पाढाही वाचला.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “फलंदाजी करण्यासाठी ही विकेट चांगली होती. पण आम्ही खराब फलंदाजी केली. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली होती, पण आम्ही मिडल ऑर्डरमध्ये विकेट गमावल्या आणि त्यातून सावरता आले नाही.आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांना 160 धावांच्या आसपास रोखण्यात यश मिळवलं होतं. पण आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराश केले.”
डेव्हिड मिलरबाबतही शुबमन गिलने मन मोकळं केलं. शुबमनने सांगितलं की, मिलर हा असा खेळाडू आहे की तो एक दोन षटकांमध्ये खेळ बदलू शकतो. तर स्वत:च्या विकेटचं विश्लेषण करताना सांगितलं की, “मला वाटले की हे पॉवरप्लेचे शेवटचे षटक आहे. मला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता, फक्त तो चेंडू चुकला कारण मी थोडा आडवा खेळण्याचा प्रयत्न केला.”
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.
