LSG vs KKR : सुनील नरीनची तडाखेदार खेळी, लखनऊला 236 धावांचं विशाल आव्हान, कोण जिंकणार?

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders 1st Innings Highlights In Marathi : कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊमधील एकाना स्टेडियममध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्याचा बहुमान मिळवला आहे. केकेआरने लखनऊ विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या.

LSG vs KKR : सुनील नरीनची तडाखेदार खेळी, लखनऊला 236 धावांचं विशाल आव्हान, कोण जिंकणार?
sunil narine and Angkrish Raghuvanshi
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 05, 2024 | 10:21 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. कोलकाताकडून सुनील नरीन याने सर्वाधिक धावा केल्या. सुनील नरीन याने 39 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 207.69 च्या स्ट्राईक रेटने 81 धावांची खेळी केली. तर लखनऊ सुपर जायंट्सकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आता लखनऊ या विशाल धावांचा पाठलाग करताना कशाप्रकारे बॅटिंग करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

सुनील नारायण व्यतिरिक्त केकेआरसाठी फिलिप सॉल्ट आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी प्रत्येकी 32-32 धावांचं योगदान दिलं. अंगकृषने 26 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्ससह 123.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. तर फिलीपच्या खेळीचत 1 सिक्स आणि 5 चौकारांचा समावेश होता. आंद्रे रसेल याने 12 धावा जोडल्या. रिंकू सिंहने 16 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन श्रेयस अय्यर याने 15 बॉलमध्ये 3 सिक्ससह 23 धावा केल्या.

तर रमनदीप सिंह आणि वेंकटेश अय्यर ही जोडी नाबाद परतली. रमनदीप सिंह याने अखेरच्या क्षणी तुफानी केळी केली. रमनदीपने 416.67 च्या स्ट्राईक रेटने 6 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह नाबाद 25 धावा केल्या. तर वेंकटेश अय्यर 1 रनवर नाबाद परतला. रमनदीपने अखेरच्या क्षणी केलेल्या या फटकेबाजीमुळे केकेआरला 210 पार मजल मारता आली. लखनऊकडून नवीन व्यतिरिक्त यश ठाकुर, रवी बिश्नोई आणि युद्धवीर सिंह या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

लखनऊसमोर 236 धावांचं आव्हान

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान आणि यश ठाकूर.