आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात मंगळवारी 29 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स आपल्या घरच्या मैदानात मु्ंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. दोन्ही संघांचा हा 10 वा सामना आहे. लखनऊने 5 तर मुंबईने 3 सामने जिंकले आहेत. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि लखनऊ पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफच्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने फार महत्त्वाचा आहे. या सामन्यानिमित्ताने आपण उभयसंघांची एकमेकांविरुद्ध असलेली आकडेवारी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.
आयपीएलच्या इतिहासात लखनऊ विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 4 सामने झाले आहेत. या 4 पैकी सर्वाधिक सामन्यात लखनऊ मुंबईवर वरचढ राहिली आहे. लखनऊने मुंबईचा 3 सामन्यात पराभव केला आहे. तर मुंबईला फक्त 1 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात गेल्या 16 व्या मोसमात एकूण 2 वेळा आमनासामना झाला होता. तेव्हा लखनऊ आणि मुंबई दोन्ही संघानी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला होता.
लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेरक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णप्पा गौतम, एश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.