
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने भिडणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सची कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा दहावा सामना असणार आहे. लखनऊने याआधी खेळलेल्या 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर मुंबईला 9 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. मुंबई 6 पॉइंट्ससह शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना मंगळवारी 30 एप्रिल रोजी होणार आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनऊ येथे होणार आहे.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
लखनऊ विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपच्या माध्यमातून फुकटात पाहता येईल.
लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेरक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णप्पा गौतम, एश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.