MI vs CSK : धोनीचा फिनिशिंग टच, दुबे-ऋतुराजची तोडफोड खेळी, मुंबईसमोर 207 रन्सचं टार्गेट

IPL 2024 MI vs CSK 1st Innings Highlights In Marathi : चेन्नईने मुंबईसमोर विजयासाठी 207 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

MI vs CSK : धोनीचा फिनिशिंग टच, दुबे-ऋतुराजची तोडफोड खेळी, मुंबईसमोर 207 रन्सचं टार्गेट
ruturaj gaikwad and shivam dube,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 14, 2024 | 9:25 PM

महेंद्रसिंह धोनी याने दिलेला फिनिशिंग टच आणि शिवम दुबे-कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनी केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा केल्या.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.