Hardik Pandya : ‘एकदम बेकार’, सुनील गावस्कर यांचं हार्दिक पांड्याच्या कॅप्टनशिपबद्दल रोखठोक मत

चेन्नई विरुद्ध मुंबईच्या पराभवानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर संतप्त दिसले. अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सनी त्याचा फिटनेस, बॉलिंग आणि कॅप्टनशिपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात हार्दिक पांड्यावर प्रहार केला आहे.

Hardik Pandya : 'एकदम बेकार', सुनील गावस्कर यांचं हार्दिक पांड्याच्या कॅप्टनशिपबद्दल रोखठोक मत
Sunil Gavaskar Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 7:53 AM

IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या अडचणी संपायच नाव घेत नाहीयत. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनल्यापासून हार्दिक पांड्यावर चहू बाजूंनी टीका सुरु आहे. हार्दिक पांड्याला आधी फॅन्सच्या हूटिंगचा सामना करावा लागला. आता टीमच्या पराभवामुळे त्याच्या कॅप्टनशिपवर प्रश्न निर्माण झालं आहे. खासकरुन चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पराभवानंतर क्रिकेट एक्टपर्ट्स त्याच्या मागे लागले आहेत. अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सनी त्याचा फिटनेस, बॉलिंग आणि कॅप्टनशिपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात हार्दिक पांड्यावर प्रहार केला आहे. धोनी विरोधात पांड्याने जी गोलंदाजी केली, त्यावर ते विशेष नाराज होते.

चेन्नई विरुद्ध मुंबईच्या पराभवानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर संतप्त दिसले. त्यासाठी त्यांनी पूर्णपणे हार्दिक पांड्याला जबाबदार धरलं. गोलंदाजी आणि कॅप्टनशिपवरुन त्यांनी हार्दिक पांड्याला बरच काही सुनावलं. खासकरुन 20 व्या ओव्हरमध्ये धोनी विरुद्ध एकदम बेकार गोलंदाजी केली, असं गावस्कर म्हणाले. “फलंदाज लेंथ बॉलच्या प्रतिक्षेत आहे, हे माहित असूनही पुन्हा तसाच चेंडू टाकणं, पुढचा चेंडू लेग साइडला फुलटॉस ही खूप सामान्य गोलंदाजी होती” असं गावस्कर म्हणाले. तुमच्या माहितीसाठी पांड्याने लास्ट ओव्हरमध्ये 26 धावा दिल्या. चेन्नईने मुंबईवर 20 धावांनी विजय मिळवला.

स्पिनर्सना हार्दिकने गोलंदाजी का नाही दिली?

गावस्कर यांनी हार्दिक पांड्याची कॅप्टनशिप खूप सामान्य असल्याच म्हटलं. मुंबई इंडियन्सची फिल्डिंग होती, त्यावेळी मोहम्मद नबीने पावरप्लेमध्ये चांगली स्पिन गोलंदाजी केली होती. त्याने 3 ओव्हरमध्ये 19 रन्स दिल्या होत्या. श्रेयस गोपालने सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स देऊन 1 विकेट काढला होता. वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु असतानाही हार्दिक पांड्याने दोन्ही स्पिनर्सना मधल्या षटकार एक ओव्हर दिली नाही. आकाश मडवालची ओव्हर बाकी असतानाही स्वत: गोलंदाजीसाठी आला. हार्दिक पांड्याचे हे निर्णय गावस्करांना अजिबात पटलेले नाहीत.

प्लान बी ची अमलबजावणी का केली नाही

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने सुद्धा हार्दिक पांड्याच्या कॅप्टनशिपबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. वेगवान गोलंदाज धावा देत असताना, स्पिन गोलंदाजांच्या हाती चेंडू न सोपवणं याचं पीटरसनलाही आश्चर्य वाटलं. हार्दिक पांड्याने प्लान बी ची अमलबजावणी का केली नाही? असा पीटरसनचा सवाल आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.