
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादची सू्त्रं आहेत. हैदराबादचा हा 11 वा आणि मुंबईचा 12 वा सामना असणार आहे. मुंबईने 11 पैकी 3 सामने जिंकलेत. मुंबई 6 पॉइंट्ससह सर्वात शेवटी 10 व्या स्थानी आहे. तर हैदराबाद 6 विजयासह चौथ्या स्थानी विराजमान आहे. हैदराबादसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हैदराबाद विजयासाठी जोरदार प्रयत्नात असणार आहे. तर मुंबई पराभवाचा वचपा घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. याआधी हे दोन्ही संघ 27 मार्च रोजी भिडले होते. तेव्हा हैदराबादने मुंबईवर 31 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता 55 व्या सामन्यात उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना सोमवारी 6 मे रोजी होणार आहे.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.