
आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुंबई इंडियन्सला 125 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 126 धावांचं सोपं आव्हान मिळालं. राजस्थान रॉयल्सने हे आव्हान 15.3 षटकात पूर्ण केलं.
राजस्थानने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मिळवली होती. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन महत्त्वाच्या फलंदाजांना शून्यावर बाद करून सामना फिरवला होता. पॉवरप्लेदरम्यानच मुंबई इंडियन्सने 4 विकेट गमावल्या. त्यांना साथ देत चहलने 3 आणि नांद्रे बर्जरने 2 विकेट घेतल्या. तसेच आवेश खानने एक विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्सला आर अश्विनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. आर अश्विन 16 धावा करून तंबूत परतला आहे.
राजस्थान रॉयल्सने 3 गडी गमवून 10 षटकात 73 धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 53 धावांची गरज आहे.
राजस्थान रॉयल्सचे 3 गडी बाद झाले आहेत. आकाश मधवालला दुसरं यश मिळालं आहे. जोस बटलरला बाद करण्यात यश आलं आहे.
राजस्थान रॉयल्सला संजू सॅमसनच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. आकाश मढवालने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
राजस्थान रॉयल्सला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. क्वेनाच्या गोलंदाजीवर यशस्वी 10 धावा करून तंबूत परतला.
मुंबई इंडियन्सने राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 34 धावांचे योगदान दिले आहे. ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. नांद्रे बर्गरने 2 आणि आवेश खानने 1 गडी बाद केला.
टिम डेविडच्या रुपाने नववा धक्का बसला. डेविड 17 धावा करून तंबूत परतला.
गेराल्ड कोएत्झी 4 धावा करून युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. चहलला तिसरं यश मिळालं.
तिलक वर्माच्या रुपाने मुंबई इंडियन्सला सातवा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्सला पियुष चावलाच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. पियुष चावला 3 धावा करून तंबूत परतला.
मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या 34 धावा करून तंबूत परतला आहे.
मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. इशान किशनही बाद झाला आहे.
डेवॉल्ट ब्रेव्हिसही काही खास करू शकला नाही. त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही.
पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला दोन धक्के बसले आहे. रोहित शर्मा आणि नमन धीर यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. ट्रेंट बोल्टने त्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
राजस्थान रॉयल्स: रोवमॅन पॉवेल, तनुश कोटियान, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक
मुंबई इंडियन्स: डेवाल्ड ब्रेविस, नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान थुशारा, नशुल्मान, नशुल्मान, कार्तिकेय. , मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना माफाका.
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रायन पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अवेश खान, रोवमान खान, पो. , शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन.