IPL 2024 : डबल हेडर सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी कोण? जाणून घ्या

| Updated on: Mar 25, 2024 | 1:12 AM

IPL 2024 Orange Cap : रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यानंतर भारतीय खेळाडू ऑरेंज कॅपचा मानकरी झाला आहे. तर पर्पल कॅपसाठी जसप्रीत बुमराह याने मोठी झेप घेतली आहे.

IPL 2024 : डबल हेडर सामन्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी कोण? जाणून घ्या
Follow us on

मुंबई : रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यामध्ये पराभूत झालेले दोन्ही संघ टार्गेटचा पाठलाग करताना हरले. लखनऊ संघ आणि मुंबई इंडियन्स संघाचा अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघाने पराभव केला. दोन्ही सामन्यांनंतर आता ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे गेलीये जाणून घ्या.

प्लेयर्ससामनेस्ट्राईक रेटरन्स
विराट कोहली4140.97203
रियान पराग3160.17181
हेनरिक क्लासेन3219.73167
शुबमन गिल4159.22164
साई सुदर्शन4160128.00

ऑरेंज कॅपवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने कब्जा मिळवला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने सर्वांना मागे टाकत ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर घेतली आहे. संजू सॅमसन याने लखनऊ सुपर जायंट्सविरूद्ध 53 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली.  प्रत्येक संघाचा आता एक-एक सामना झाला असून यामध्ये पाच संघांनी विजय मिळवले आहेत तर इतर पाच विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.

गोलंदाजसामनेइकॉनोमीविकेट्स
मुस्तफिझुर रहमान38.83 7
मयंक यादव35.126
युजवेंद्र चहल35.506
मोहित शर्मा37.756
खलील अहमद48.186

पर्पल कॅपचा मानकरी बांगलादेशचा सीएसकेमधील मुस्तफिझुर रहमान आहे. मुस्तफिझुरने पहिल्या सामन्यात चार विकेट घेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या जागी जसप्रीत बुमराह याने तीन विकेट घेत उडी घेतली आहे. तिसऱ्या आणि चौख्या स्थानी असलेले टी नटराजन आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत.  त्यानंतर पाचव्या स्थानी कुलदीप यादव असून त्याने दोन विकेट घेतल्या आहेत.

मुंबई वि. गुजरात सामन्याचा धावता आढावा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्सने प्रथम बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 168-6 धावा केल्या होत्या. गुजरात संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठालाग करताना मुंबईची गाडी मागेच अडकली.पलटणला 20 ओव्हरमध्ये 162-9 धावा करता आल्या. मुंबईचा गुजरात संघाने सहा धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड

गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.